मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

Coronavirus: 21 दिवस व्हेंटिलेटरवर होता रुग्ण; बरा झाल्यानंतर डॉक्टरांच्या गळ्यात पडून अक्षरशः रडला

Coronavirus: 21 दिवस व्हेंटिलेटरवर होता रुग्ण; बरा झाल्यानंतर डॉक्टरांच्या गळ्यात पडून अक्षरशः रडला

 एक रुग्ण तब्बल 21 दिवस व्हेंटिलेटरवर होता. 21 दिवसांच्या उपचारानंतर तो बरा झाला. मात्र, रुग्णालयातून जाताना तो खूपच भावुक झाला होता. आपल्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या गळ्यात पडून अक्षरशः तो रडू लागला.

  • Published by:  News18 Desk

मुझफ्फरपूर (उत्तर प्रदेश), 14 मे : कोरोनामुळं देशातील परिस्थिती (Corona Situation in India) बिकट आहे, काही राज्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या घटत असली तरी अद्याप मृतांची संख्या चिंता वाढवणारी आहे. कोरोनामुळं ज्यांची तब्येत खूपच खालावते त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवावं लागतं. अशा रुग्णाचे प्राण वाचवताना डॉक्टरांनाही खूप कसरत करावी लागते. अशीच एक घटना मुझफ्फरपूर उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) येथून समोर आली आहे. येथे एक रुग्ण तब्बल 21 दिवस व्हेंटिलेटरवर होता. 21 दिवसांच्या उपचारानंतर तो बरा झाला. मात्र, रुग्णालयातून जाताना तो खूपच भावुक झाला होता. आपल्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या गळ्यात पडून अक्षरशः तो रडू लागला.

डॉक्टरांनीही या भावनिक क्षणी त्याची पाठ थोपटत फुलांचा गुच्छ देऊन त्याचा उत्साह आणखीन वाढवला आणि त्यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला. सध्या मुजफ्फरपूर भागांमध्ये कोरोनाची स्थिती विदारक आहे. रुग्णांवर उपचार करण्यासाठी खासगी रुग्णालयात भरमसाठ पैसे घेतले जात आहेत.

संबंधित रुग्णाच्या नातेवाईकांनी सांगितले की, तो 21 दिवस व्हेंटिलेटरवर होता. आमच्यासाठी एक-एक क्षण वेळ काढणं मुश्कील झालं होतं. आमच्या पेशंटला आज घरी घेऊन जात असताना आम्ही सर्वजणच भावूक झालो आहोत. डॉक्टर मोहन आणि गौरव वर्मा यांनी रात्रंदिवस एक करून आमच्या रुग्णाला वाचवलं त्यांचे उपकार आम्ही कधीच विसरणार नाही, असेही ते म्हणाले.

हे वाचा - प्रेमकथा मांडणारं पुस्तक करणार प्रदर्शित, ‘करुणा धनंजय मुंडे’ यांच्या फेसबुक पोस्टमुळे खळबळ

हे दोघेही तरुण डॉक्टर असून या कोरोनाच्या काळात एकीकडे खाजगी रुग्णालये जास्त फी आकारत असताना ते माफक दरामध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करत आहेत. या दोघांकडे स्वतःचा दवाखानाही नव्हता त्यांनी भाड्याच्या इमारतीमध्ये दवाखाना सुरू केला आहे.

हे वाचा - Oxygen Shortage in Goa: गोव्यात ऑक्सिजनअभावी 3 दिवसात 41 मृत्यू; कारण काय तर अनुभवी ट्रॅक्टर चालक नाही

आम्ही दवाखाना सुरू केला तेव्हा येथे फक्त एकच रुग्ण होता, मात्र आता संख्या वाढली असून तीस रुग्ण दाखल झाले आहेत. एक दिवस तर ऑक्सिजन संपल्यामुळे डॉक्टर गौरव हे स्वतः काही जणांना घेऊन ऑक्सीजन प्लांटवर गेले आणि त्यांनी स्वत: खांद्यावरून ऑक्सिजन सिलेंडर घेऊन आले होते आणि त्यानंतर रुग्णावर उपचार सुरू ठेवले, असे डॉक्टर मोहन यांनी सांगितले.

सध्याच्या काळात अनेक खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांकडून खूपच पैसे वसूल केले जातात, अशा स्थितीमध्ये आम्ही रुग्णांना कमीत-कमी खर्चामध्ये उपचार देण्याचा प्रयत्न करत आहोत, असे डॉक्टर गौरव यांनी सांगितले.

First published:

Tags: Bihar, Corona patient, Corona virus in india, Coronavirus