मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

नागपुरात कोरोनाचा उद्रेक, 24 तासांत 10 जणांचा मृत्यू, 995 बाधित!

नागपुरात कोरोनाचा उद्रेक, 24 तासांत 10 जणांचा मृत्यू, 995 बाधित!

 जरीपटका, इंदोरा, कळमना स्वावलंबीनगर, खामला, गणेशपेठ, लक्ष्मीनगर, बजाज नगर, हे नागपूरचे हॉटस्पॉट बनले आहे.

जरीपटका, इंदोरा, कळमना स्वावलंबीनगर, खामला, गणेशपेठ, लक्ष्मीनगर, बजाज नगर, हे नागपूरचे हॉटस्पॉट बनले आहे.

जरीपटका, इंदोरा, कळमना स्वावलंबीनगर, खामला, गणेशपेठ, लक्ष्मीनगर, बजाज नगर, हे नागपूरचे हॉटस्पॉट बनले आहे.

    नागपूर, 03 मार्च : महाराष्ट्रात कोरोनाची (Corona) लाट ओसरली असताना आता पुन्हा एकदा झपाट्याने रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. अमरावती, अकोला आणि यवतमाळपाठोपाठ नागपूरमध्येही परिस्थिती चिंताजनक बनत चालली आहे. मागील 24 तासांत नागपूरमध्ये 995 कोरोनाचे नवीन रुग्ण आढळले असून 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नागपूरमध्ये मागच्या तीन दिवसात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होतांना दिसत असताना अचानक मागील 24 तासात कोरोनाच्या आकड्याने उसळी घेतली आहे. मागील चोवीस तासात 995 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. तर 10 जणांचा मृत्यू झाला आहे. सावधान! 2050 पर्यंत ऐकण्याची क्षमता होणार कमी; WHOचा इशारा 24 तासात 578 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सध्या नागपूरमध्ये ८८४४ ऍक्टिव्ह केसेस आहे. जरीपटका, इंदोरा, कळमना स्वावलंबीनगर, खामला, गणेशपेठ, लक्ष्मीनगर, बजाज नगर, हे नागपूरचे हॉटस्पॉट बनले आहे. जिल्हा परिषदचे शिक्षण विभागातील ११ कर्मचारी पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे.  त्यामुळे शिक्षण विभागाच्या दैनंदिन कामकाजावर, शालेय परीक्षाच्या नियोजन व आरटीई प्रवेश प्रकियाच्या कामावर याचा प्रभाव पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात पोहोचला कोरोना, तब्बल 56 कर्मचाऱ्यांना लागण दरम्यान,अमरावती जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना आता  कोरोना अमरावती विद्यापीठापर्यंतही पोहोचला आहे. नुकत्याच विद्यापीठाने अधिकारी कर्मचारी यांची कोरोना चाचणी केली. या चाचणीमध्ये जवळपास 300 कर्मचारी अधिकाऱ्यांपैकी 56 कर्मचाऱ्यांना-अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे तर यापैकी 13 कर्मचाऱ्यांच अख्खं कुटुंब कोरोनाबाधित झाल्याची  माहिती विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ हेमंत देशमुख यांनी दिली आहे. आपल्याच प्रेमात आकंठ बुडाली; बॉयफ्रेंडशी ब्रेकअप करून स्वतःशीच केलं लग्न अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशीम आणि यवतमाळ या पाच जिल्ह्याचा शैक्षणिक कारभार संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील चालतो. यामुळे येणाऱ्या काळात याचा परिणाम विद्यापीठाच्या परीक्षा व निकालावर ही होऊ शकतो.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Corona hotspot, Corona spread, Covid-19 positive, Mumbai, Nagpur, नागपूर

    पुढील बातम्या