मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

चिंता वाढवणारी बातमी; HIV Positive महिलेच्या शरीरात 216 दिवस राहिला कोरोनाचा विषाणू

चिंता वाढवणारी बातमी; HIV Positive महिलेच्या शरीरात 216 दिवस राहिला कोरोनाचा विषाणू

उल्हासनगर येथील बालसुधारगृहात शिक्षा भोगत असलेल्या 14 मुलांना कोरोनाची बाधा झाली आहे.

उल्हासनगर येथील बालसुधारगृहात शिक्षा भोगत असलेल्या 14 मुलांना कोरोनाची बाधा झाली आहे.

एका 36 वर्षीय HIV पॉझिटिव्ह महिलेमध्ये जवळपास 216 दिवसांपर्यंत कोरोना इन्फेक्शन राहिल्याचं पाहायला मिळालं. आणखी एक हैराण करणारी बाब म्हणजे यादरम्यान व्हायरसमध्ये 32 वेळा म्यूटेशन (Mutations) झालं.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 05 जून : कोरोनाबाबत (Coronavirus) आता एक हैराण करणारी बातमी समोर आली आहे. एका 36 वर्षीय HIV पॉझिटिव्ह महिलेमध्ये जवळपास 216 दिवसांपर्यंत कोरोना इन्फेक्शन राहिल्याचं पाहायला मिळालं. आणखी एक हैराण करणारी बाब म्हणजे यादरम्यान व्हायरसमध्ये 32 वेळा म्यूटेशन (Mutations) झालं. एका नव्या अभ्यासात हा खुलासा झाला आहे. हे प्रकरण दक्षिण आफ्रिकेतील (South Africa) आहे.

साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, व्हायरसच्या (Virus) स्पाइक प्रोटीनमध्येही (Spike Protein) 13 वेळा म्यूटेशन झालं. स्पाइक प्रोटीनची ओळख करुनच बहुतेक लसी परिणाम करत असतात. अद्याप याबाबतची माहिती मिळालेली नाही, की या महिलेतून हे म्यूटेशन इतर कोणामध्ये ट्रान्समिट झालं आहे का? यााबाबतचा एक शोध प्री-प्रिंट जर्नल medRxiv मध्ये प्रकाशित झाला आहे.

अनलॉकबाबत राज्य सरकारकडून नियमावली जाहीर, 5 स्तरात होणार अंमलबजावणी

या स्टडीमध्ये लेखक टूलियो डि ओलिवीरा (Tulio de Oliveira) यांनी म्हटलं आहे, की अशीच आणखी प्रकरणं आढळली तर हे समजू शकेल की HIV इन्फेन्शन नव्या व्हेरियंटचा सोर्स ठरू शकतं. अशा रुग्णांमध्ये कोरोना विषाणू बराच काळ राहू शकतो. यातून त्याला म्यूटेट होण्याची संधी मिळते. ते म्हणाले, की या केसबाबत कदाचित कोणालाही समजलंदेखील नसतं कारण सुरुवातीच्या उपचारानंतर महिलेमध्ये कमी लक्षणं होती. मात्र, विषाणू तिच्या शरीरात होता.

सोमवारपासून अनलॉक होणारे जिल्हे, वाचा संपूर्ण यादी

रिपोर्टनुसार, या प्रकरणाची माहिती तेव्हा मिळाली जेव्हा ही महिला 300 HIV पॉझिटिव्ह लोकांबाबत केलेल्या स्टडीमध्ये सहभागी झाली. यात असंही समोर आलं, की या महिलेशिवाय चार आणखी लोक असे होते, ज्यांच्या शरीरात कोरोना एका महिन्यापेक्षा अधिक काळापासून आहे. याआधी ज्या लोकांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते, अशा लोकांमध्येही बराच काळ कोरोनाचा प्रादुर्भाव राहात असल्याचं पाहिलं गेलं आहे. मात्र, हे प्रकरण त्यापेक्षा वेगळं आहे. हा रिसर्च अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. विशेषतः आफ्रिकेसाठी, कारण याठिकाणी 2020 मध्ये 2 कोटीहून अधिक लोकांनी HIV होता.

First published:

Tags: Corona patient, Corona spread