Home /News /coronavirus-latest-news /

Highest Cases : राज्यात कोरोनाचा विस्फोट; आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा; सक्रिय रुग्णसंख्या 2 लाखांपार..

Highest Cases : राज्यात कोरोनाचा विस्फोट; आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा; सक्रिय रुग्णसंख्या 2 लाखांपार..

Maharashtra Corona Update : राज्यात कोरोनाचा उद्रेक

  Maharashtra Corona Highest Cases : मुंबई, 21 मार्च : मुंबई पालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार आज शहरात सर्वाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. अवघ्या मुंबईतच कोरोना रुग्णसंख्या 3000 च्या पार केली आहे. दुसरीकडे राज्यातही रुग्णसंख्येचे वाढता वेग पाहून सर्वांचीच धडकी भरली आहे. 20 मार्च रोजी राज्यात सुमारे 27000 रुग्ण सापडले होते. त्यानंतर अवघ्या 24 तासात 30,535 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. हा आकडा आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे. (Maharashtra Corona Highest Cases till now) आज राज्यात 30,535 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली असून 99 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.15 % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1,83,56,200 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 24,79,628 (13.51 टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 9,69,867 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 9,601 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. त्याशिवाय आज राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या 2,10,120 इतकी आहे. हे ही वाचा-महाराष्ट्रात कोरोनाने मोडले आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड, 24 तासांत सर्वाधिक रुग्ण आज 11,314 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात आजपर्यंत एकूण 22,14,867 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 89.32 % एवढे झाले आहे. ((Maharashtra Corona Highest Cases till now)) काय आहे पुण्याची परिस्थिती? पुण्यात गेल्या 24 तासात 2900 पाझिटिव्ह रुग्णांची वाढ. - दिवसभरात 1242 रुग्णांना डिस्चार्ज. - पुण्यात कोरोनाबाधीत 28 रुग्णांचा मृत्यू, 8 रूग्ण पुण्याबाहेरील. - 519 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. - पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 235394. - पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 22524. - एकूण मृत्यू -5053. -आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज 207817. - आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी-12929 नागपूर कोरोना अपडेट- नागपूरात गेल्या 24 तासात 3614 नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले असून 32 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात 1859 रुग्ण बरे झाले असून सध्या नागपूरात अॅक्टिव्ह रुग्णाचा आकडा 29348 वर पोहचला आहे.

  तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

  Published by:Meenal Gangurde
  First published:

  Tags: Breaking News, Corona spread, Corona updates, Maharashtra, Mumbai

  पुढील बातम्या