Home /News /coronavirus-latest-news /

मुंबईत कोरोनामुळे मृत्यूचा आकडा एकअंकी; हा हर्ड इम्युनिटीचा परिणाम?

मुंबईत कोरोनामुळे मृत्यूचा आकडा एकअंकी; हा हर्ड इम्युनिटीचा परिणाम?

धारावीत आता 88 अॅक्टिव्ह रूग्ण, दादर सेथे 458, तर माहीम येथे 272 अॅक्टिव्ह रूग्णांची नोंद झाली आहे.

धारावीत आता 88 अॅक्टिव्ह रूग्ण, दादर सेथे 458, तर माहीम येथे 272 अॅक्टिव्ह रूग्णांची नोंद झाली आहे.

मुंबई शहरात कोरोनाव्हायरस (coronavirus) संसर्गाची प्रकरणे सातत्याने कमी होत आहेत. विशेष म्हणजे मृत्यूचा आकडा एकअंकीपर्यंत पोहोचला आहे.

    मुंबई, 17 डिसेंबर : मुंबई शहरात कोरोनाव्हायरस (coronavirus) संसर्गाची प्रकरणे सातत्याने कमी होत आहेत. विशेष म्हणजे मृत्यूचा आकडा एकअंकीपर्यंत पोहोचला आहे. कोविड टास्क फोर्सने असा विश्वास व्यक्त आहे की, मुंबईत गर्दीच्या ठिकाणी हर्ड इम्युनिटी (Herd immunity) पाहायला मिळत आहे. दोन दिवसांपासून दररोज मुंबईत मृत्यूचा आकडा 7 इतका येत असून एप्रिलनंतर प्रथमच सलग दोन दिवशी एकाच आकड्यात मृत्यूची संख्या दिसत आहे. मुंबईत कोविडचे 766 गंभीर रुग्ण आहेत. अनेक महिन्यांनंतर मुंबईत कोरोनाची रुग्णसंख्या 1000 पेक्षा कमी पाहायला मिळत आहे. रिकव्हरी रेट 93% पर्यंत वाढला आहे आणि संसर्ग दर 0.21% पर्यंत खाली आला आहे. रुग्णालयांमध्ये 72% कोविड बेड्स आणि तब्बल 50 टक्के ICU बेड्स रिकामी आहेत, अशी माहिती समोर आली आहे. नोव्हेंबरमध्ये साततत्याने दिलासादाखल आकडे मुंबईत पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्र सरकारच्या राज्य-कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित हे देखील हर्ड इम्युनिटी यामागील कारण असल्याने मानतात. हर्ड इम्युनिटी म्हणजे सामूहिक प्रतिकारशक्ती. डॉ. राहुल पंडित म्हणाले की, “मुंबईतील गर्दीच्या भागांतून कोरोनाच्या केसेस कमी झाल्या आहेत. अशावेळी ही हर्ड इम्युनिटी आहे का? असा विचार येणं स्वाभाविक आहे. मला वाटंत की हर्ड इम्युनिटी या गर्दीच्या वस्त्यांमध्ये आली आहे. आता यापुढे सेरो सर्व्हेमधून ही निश्चित जाणून घ्यावे लागेल. त्याचबरोबर, कोविड बेड मॅनेजमेंट पाहणारे बीएमसी टास्क फोर्सचे सदस्य डॉ. गौतम भन्साळी यांना आरोग्य कर्मचार्‍यांच्या मेहनतीचे आणि रूग्णांमधील जागरूकता आणि समूहातील प्रतिकारशक्तीमुळे हे शक्य झाल्याचे सांगतात. डॉ. गौतम भन्साळी म्हणतात की "आज प्रत्येक रूग्णाला माहित आहे की ऑक्सिमीटर म्हणजे काय? ऑक्सिजन सॅच्युरेशन म्हणजे काय, लोकांना एका वर्षापूर्वी याबद्दल माहित नव्हते. त्यांना माहित आहे की जर ऑक्सिजनची पातळी कमी तर त्यांना रुग्णालयात जावे लागेल. यासाठी बेड ताबडतोब उपलब्ध होतील, उपचार त्वरित सुरू होतील... याशिवाय आयसीयूमध्येही व्हेंटिलेटर भरपूर आहेत. मुंबईत तापमानाची घसरण आणि नवीन वर्षाच्या उत्सवामध्ये कोविडच्या नव्या लाटेची अपेक्षा असताना महाराष्ट्र सरकारने कोविड रूग्णांसाठी रूग्णालयात 80% बेड आरक्षणाचा जुना निर्णय फेब्रुवारी 2020 पर्यंत वाढविला आहे आणि सार्वजनिक ठिकाणी मास्क मोहीम सुरू केली आहे.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Corona, Mumbai

    पुढील बातम्या