नवी दिल्ली, 28 मे : देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत असून दररोज 2500 हून अधिक नवीन रुग्णांची नोंद होत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 2685 नवीन रुग्ण आढळले आहेत. यादरम्यान 33 रुग्णांच्या मृत्यूची नोंद रेकॉर्डवर झाली आहे. 2158 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली. देशातील एकूण रुग्णांपैकी 98.75 टक्के लोक आतापर्यंत बरे झाले आहेत. सध्या देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 16,308 झाली (India Corona Update) आहे.
एएनआयने आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने म्हटले आहे की, देशात कोरोनाचे दैनिक पॉजिटिविटी प्रमाण 0.60 टक्के आहे. यापूर्वी शुक्रवारी 2710 रुग्णांची नोंद झाली होती. गुरुवारी 2628, बुधवारी 2124 आणि 24 मे रोजी 1675 रुग्ण आढळले. आदल्या दिवसाच्या तुलनेत शनिवारी नवीन रुग्णांची संख्या 25 ने कमी झाली. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, आदल्या दिवसाच्या तुलनेत शनिवारी देशात सक्रिय रुग्णांमध्ये 494 ची वाढ झाली आहे.
केरळमध्ये सक्रिय प्रकरणांमध्ये सर्वाधिक 211 वाढ नोंदवली गेली. त्यानंतर महाराष्ट्रात 207 आणि राजस्थानमध्ये 86 ची वाढ झाली आहे. यापूर्वी दिल्लीत जिथे सर्वाधिक रुग्ण आढळत होते, तिथे आता गेल्या 24 तासात सक्रिय रुग्णांच्या संख्येत 34 ने घट झाली आहे. त्याचप्रमाणे यूपी आणि हरियाणामध्ये 10-10 प्रकरणे कमी झाली आहेत.
हे वाचा -
फेस पॅक आणि फेशियल टोनर म्हणून समुद्री मिठाचा असा करा उपयोग, स्कीन होईल ग्लोइंग
कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंबद्दल बोलायचे झाल्यास, सरकारी नोंदीमध्ये 33 नवीन मृत्यूची नोंद झाली होती. परंतु 32 मृत्यू केरळमध्ये अगोदर झालेल्यांची आता नोंद झाली आहे. नवीन प्रकरणांमध्ये राजस्थानमध्ये फक्त एकाचा मृत्यू झाला आहे. सरकारी आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत एकूण 5,24,572 लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.
हे वाचा -
टक्कल पडलेल्यांसाठी आशेचा किरण! या औषधामुळे सहा महिन्यात पुन्हा उगवणार केस
दिल्लीत गेल्या 24 तासांत कोरोनाचे सर्वाधिक 479 रुग्ण बरे झाले आहेत. त्यानंतर केरळमध्ये 480, महाराष्ट्रात 329, हरियाणामध्ये 246 आणि यूपीमध्ये 131 लोकांनी कोविडचा पराभव केला. आतापर्यंत देशात एकूण 4,26,09,335 लोकांनी कोरोनावर विजय मिळवला आहे. कोरोना चाचणीबद्दल बोलायचे झाले तर, गेल्या 24 तासात 4,47,637 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.