मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

कोरोना आणखी किती परीक्षा घेणार?....हा PHOTO निशब्द करणारा...!

कोरोना आणखी किती परीक्षा घेणार?....हा PHOTO निशब्द करणारा...!

देशात कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असली तरी या महासाथीने अनेक जखमा ठेवल्या आहेत. ज्या भरून निघायला पुढील काही काळ जावा लागेल.

देशात कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असली तरी या महासाथीने अनेक जखमा ठेवल्या आहेत. ज्या भरून निघायला पुढील काही काळ जावा लागेल.

देशात कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असली तरी या महासाथीने अनेक जखमा ठेवल्या आहेत. ज्या भरून निघायला पुढील काही काळ जावा लागेल.

  • Published by:  Meenal Gangurde

तामिळनाडू, 4 जुलै : कोरोनाविरोधातील (CoronaVirus) लढाई जिंकण्यात जरी आपल्याला यश मिळ असल्याचं दिसत असलं, तरी या महासाथीने देशात अनेक जखमा सोडल्या आहेत. ज्या बऱ्या होण्यासाठी पुढील काही काळ द्यावा लागेल. याचं एक उदाहरण तामिळनाडूतील थिरूथानी येथे पाहायला मिळत आहे. येथे एका शेतकऱ्याने बैलाच्या जागी सायकलीने शेत नांगरावं लागत आहे.

ही कहाणी आहे 37 वर्षीय नागराजची. ते फुलांची शेती करून आपलं घर चालवतात. या फुलांचा उपयोग मंदिर-पूजेच्या ठिकाणी किंवा कार्यक्रमांमध्ये केला जातो. लॉकडाऊनमुळे मंदिर बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे त्यांच्या शेतातील फुलं विकली गेली नाही. परिणामी घरात आर्थिक चणचण जाणवू लागली. नागराजला सध्या कोरोनामुळे आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. (Corona causes farmers to face financial difficulties)

हे ही वाचा-VIDEO : खरी मैत्री; भुकेल्या बकरीच्या मदतीला धावून आला कुत्रा, बाटलीनं पाजलं दूध

मात्र तरीही हा शेतकरी खचला नाही. त्याने पुन्हा एकदा फुलांची शेतीची तयारी सुरू केली. यासाठी मुलाला शाळेतून मोफत मिळालेल्या सायकलाचा वापर केली. नांगरता येईल अशी या सायकलीची रचना केली. आता नागराजने या सायकलीच्या माध्यमातून शेती नांगरण्यास सुरुवात केली आहे. आर्थिक संकटातून उभं राहणं इतकं सोपं नसतं. अनेकजण हे सहन न झाल्यानं आत्महत्येसारखं पाऊल उचलतात. मात्र नागराग एक शेतकरी आहे आणि त्याच्या मनगटात हे संकट पार करण्याचं बळ आहे. अर्था यामध्ये त्याचं कुटुंब आणि अगदी 11 वर्षांचा मुलगादेखील पाठिशी खंबीरपणे उभा आहे. शेत नांगरण्यासाठी नागराजला त्याचा मुलगा आणि भाऊदेखील मदत करीत आहे. नागराजचा 11 वर्षांचा मुलगा ऑनलाइन अभ्यासाबरोहरच वडिलांना शेतात मदत करतो. त्याने सांगितलं की, तो नेहमी वडील आणि कुटुंबातील सदस्यांसोबत शेतात काम करतो. जेव्हा वडील दमतात तेव्हा तो त्यांना मदत करतो. यापूर्वीदेखील असे अनेक फोटो समोर आले आहे. जे पाहून मन खिन्न होतं.

First published:

Tags: Coronavirus, Economic crisis, Farmer, Tamilnadu