• Home
 • »
 • News
 • »
 • coronavirus-latest-news
 • »
 • Coronavirus : राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या घटली; मात्र मृत्यूदराने वाढवली चिंता

Coronavirus : राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या घटली; मात्र मृत्यूदराने वाढवली चिंता

सध्या राज्यातील दैनंदिन कोरोनामुक्तांची संख्या ही नव्या रुग्णांच्या संख्येपेक्षा अधिक आढळून येत आहे. ही दिलासादायक बाब आहे.

 • Share this:
  मुंबई 21 सप्टेंबर :  देशभरात मागील काही महिन्यांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं होतं. या काळात आरोग्य सुविधांच्या अभावामुळे अनेकांना उपचाराविना आपला जीव गमवावा लागला होता. मात्र, आता परिस्थिती काही प्रमाणात आटोक्यात येत असल्याचं चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातही कोरोनाची दुसरी लाट (2nd Wave of Coronavirus) ओसरत असल्याचं चित्र आहे. सध्या राज्यातील दैनंदिन कोरोनामुक्तांची संख्या ही नव्या रुग्णांच्या संख्येपेक्षा अधिक आढळून येत आहे. ही दिलासादायक बाब आहे. सोमवारीही अशीच परिस्थिती पाहायला मिळाली. सोमवारी दिवसभरात राज्यात कोरोनाचे नवे 2 हजार 583 रुग्ण (Corona Cases in Maharashtra) आढळून आले आहेत. तर, 3 हजार 836 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. पुढील महिन्यापासून इतर देशांना भारताकडून लसी, ‘Vaccine Friendship’ ला सुरुवात कोरोनातून बरं होणाऱ्यांची संख्या जरीही अधिक असली तर आणखी एक बाब मात्र चिंता वाढवत आहे. सोमवारी एकूण 28 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णांच्या मृत्यूच्या आकड्यात दररोज भर पडताना दिसत आहे. आतापर्यंत राज्यात 63,40,723 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट 97.18 टक्के (Corona Recovery Rate) इतका झाला आहे. आतापर्यंतच्या राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 65,24,498 वर पोहोचली आहे. राज्यातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर 2.12 टक्के इतका असून आजपर्यंतच राज्यात 134546 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत प्रयोगशाळेत तब्बल 5,71,64,401 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. यातील 65,24,498 नमुने पॉझिटिव्ह (कोरोनाबाधित) आले आहेत. बापरे! लस घेताना तुटली सुई, तरुणाचा हात आणि पाय झाला जायबंदी सध्या राज्यात 2,75,736 कोरोना रुग्ण होम क्वारंटाईन असून त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत. तर, 1,677 रुग्ण हे संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सध्या 41,672 सक्रीय रुग्ण आहेत.
  Published by:Kiran Pharate
  First published: