Corona रुग्णसंख्येचा वेग वाढतोय तर लसीकरणाचा घटतोय, पाहा आतापर्यंत किती जणांना मिळाली Vaccine

Corona रुग्णसंख्येचा वेग वाढतोय तर लसीकरणाचा घटतोय, पाहा आतापर्यंत किती जणांना मिळाली Vaccine

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत (Corona Cases in India) सतत वाढ होत आहे, तर याउलट लसीकरणाचा वेग मात्र अत्यंत कमी आहे. मागील महिन्याच्या सुरुवातीपासून लसीकरणाचा (Corona Vaccination in India) वेग कमी होत असल्याचं चित्र आहे

  • Share this:

नवी दिल्ली 04 मे : जगभरात कोरोनाचा (Coronavirus) प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे, मात्र भारताची स्थिती अत्यंत गंभीर आहे. देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत (Corona Cases in India) सतत वाढ होत आहे, तर याउलट लसीकरणाचा वेग मात्र अत्यंत कमी आहे. मागील महिन्याच्या सुरुवातीपासून लसीकरणाचा (Corona Vaccination in India) वेग कमी होत असल्याचं चित्र आहे. कारण, लस बनवणाऱ्या कंपन्यांनाही मागणीनुसार पुरवठा आणि आयात वाढवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे.

5 एप्रिलला दररोज होणाऱ्या लसीकरणाची संख्या 45 लाखावर पोहोचली होती, मात्र आता हा आकडा सरासरी 25 लाखावर आला आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येदरम्यान देशातील अनेक राज्यांमध्ये आरोग्य सुविधांचा अभाव जाणवत आहे. सरकारी कोविन पोर्टलवरील https://dashboard.cowin.gov.in आकडेवारीनुसार, जगभरात सर्वाधिक लसी बनवण्याची क्षमता असलेल्या भारतानं आपल्या 1.35 अब्ज लोकसंख्येपैकी केवळ 9.5% लोकांनाच लस दिली आहे. म्हणजेच आतापर्यंत केवळ दहा टक्के लोकांचं लसीकरण झालं आहे.

स्मार्ट शहर नव्हे Smart Village, या गावात आता एकही कोरोना रुग्ण नाही!

लसीची निर्मिती करणाऱ्या दोन्ही कंपन्यांच्या म्हणण्यानुसार, सध्या त्यांची लस बनवण्याची क्षमता केवळ 7 ते 8 कोटी प्रति महिना इतकीच आहे. ही क्षमता वाढवण्यासाठी त्यांना आणखी काही महिने किंवा त्याहून अधिकचा काळ लागणार आहे. मात्र, 1 मेपासून 18 वर्षावरील लोकांसाठीचं लसीकरणही सुरू झालं आहे. त्यामुळे, लसींचा तुटवडा जाणवत आहे. यानंतर लस घेणाऱ्यांची एकूण संख्या 80 कोटीवर पोहोचली आहे.

पत्नीला कोरोना झाल्यानं मुलीची जबाबदारी खांद्यावर;पोलीस अधिकाऱ्याचा थेट राजीनामा

रशियाच्या स्पुतनिक 5 या लसीचे 1.5 लाख डोस शनिवारी भारतात पोहोचले आहेत. सरकारनं म्हटलं आहे, की आणखी लाखो डोस भारतात येणार आहेत.

Published by: Kiran Pharate
First published: May 4, 2021, 12:51 PM IST

ताज्या बातम्या