मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /हुश्श! सहा महिन्यांत पहिल्यांदा कोरोना ACTIVE CASES 3 लाखांच्या खाली, दुसरी लाट संपली की तिसरी सुरू?

हुश्श! सहा महिन्यांत पहिल्यांदा कोरोना ACTIVE CASES 3 लाखांच्या खाली, दुसरी लाट संपली की तिसरी सुरू?

भारतातील कोरोनाची दुसरी लाट अखेरच्या टप्प्यात आल्याचं चित्र असून गेल्या सहा (Corona active cases toll comes below 3 lakh first time in last 6 months) महिन्यांत पहिल्यांदाच ऍक्टिव्ह केसेसची संख्या 3 लाखांच्या खाली नोंदवली गेली आहे.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 27 सप्टेंबर : भारतातील कोरोनाची दुसरी लाट अखेरच्या टप्प्यात आल्याचं चित्र असून गेल्या सहा (Corona active cases toll comes below 3 lakh first time in last 6 months) महिन्यांत पहिल्यांदाच ऍक्टिव्ह केसेसची संख्या 3 लाखांच्या खाली नोंदवली गेली आहे. रविवारी देशभरात नोंदवल्या गेलेल्या एकूण ऍक्टिव्ह केसेसची (Covid cases declined) संख्या होती 2 लाख 99 हजार 620. आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलेल्या या आकडेवारीवरून कोरोनाच्या दुसऱ्या (tail of second wave) लाटेचं हे शेवटचं टोक असल्याचं सिद्ध होत आहे.

घसरती आकडेवारी?

गेल्या चार आठवड्यांपासून देशात कोरोना रुग्णांची आकडेवारी घसरत असल्याचं सकारात्मक चिंत्र दिसत आहे. ऑगस्टपासून केरळमध्ये वाढत चाललेल्या कोरोना रुग्णांचा अपवाद वगळला, तर देशभरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. दुसरी लाट शिखर गाठत असताना मे महिन्यात देशभरातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या होती 37 लाखांच्याही वर. आता हा कमी होत होत 3 लाखांच्याही खाली नोंदवला गेला आहे.

दुसरी लाट संपली की तिसरी सुरू?

दुसऱ्या लाटेचा हा शेवट असला तरी तिसऱ्या लाटेची सुरुवातही ठरू शकते, असा इशारा काही डॉक्टरांनी दिला आहे. सध्या देशभरातील विविध राज्यांमध्ये सुरु असलेला सणासुदीचा काळ आणि कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे नियमांमध्ये आणण्यात आलेली शिथिलता यामुळे पुन्हा एकदा कोरोनाची रुग्णसंख्या वाढू शकते, असा इशारा देण्यात आला आहे. मात्र लसीकरणानेदेखील वेग घेतल्यामुळे ही शक्यता कमी असल्याचं मतही काही तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

हे वाचा- प्रियकराची प्रेयसीसोबत फाशी, एकमेकांसोबत लग्न न झाल्याने टोकाचा निर्णय

सावध राहण्याचा इशारा

कोरोनाचं लसीकरण झालं असलं तरी कोरोनाबाबतचे नियम सर्वांनी पाळणं गरजेचं असल्याचं तज्ज्ञ सांगत आहेत. लसीकरण झाल्यानंतर कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता असल्यामळे सर्वांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात दुसऱ्या लाटेची सुरुवात झाली होती. त्यानंतर आता ही लाट ओसरत असल्याचं दिलासादायक चित्र निर्माण झालं आहे.

First published:

Tags: Corona, Corona patient