मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

दुसऱ्यांना सर्टिफिकेट देण्यासाठी पठ्ठ्याने 8 वेळा घेतली लस, 9 वी लस घेताना झाली भयंकर अवस्था

दुसऱ्यांना सर्टिफिकेट देण्यासाठी पठ्ठ्याने 8 वेळा घेतली लस, 9 वी लस घेताना झाली भयंकर अवस्था

इथं लोक दोन वेळा लस घ्यायला घाबरतात, या पठ्ठ्याने 8 वेळा लस घेतली.

  • Published by:  Meenal Gangurde

नवी दिल्ली, 23 डिसेंबर : केवळ भारतातच नाही तर परदेशातही लसीकरणाच्या फसवणुकीचे प्रकार समोर येत आहे. बेल्जियममधून लसीकरण (Vaccination) फसवणुकीचा असाच एक प्रकार समोर आला आहे. येथे एका तरुणाला एक वा दोन वेळेस नाही तर तब्बल 8 वेळा लस देण्यात आली. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा तरुण नवव्यांदा लस घेण्यासाठी गेला असता त्याला अटक करण्यात आली.

ही घटना बेल्जियममधील शॉर्लरॉय शहरातील आहे. येथे एका तरुणाला पैसे घेऊन दुसऱ्यांऐवजी लस घेण्याच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली आहे. बेल्जियम मीडिया लावेनिरच्या वृत्तानुसार, ज्या लोकांना लस न घेता केवळ सर्टिफिकेटची आवश्यकता आहे, हा तरुण अशा लोकांच्या संपर्कात होता. या लोकांकडून मोठी रक्कम घेऊन हाच त्यांच्या लशी घेत होता.  सातत्याने लसीकरण करीत असल्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांनी 9 व्यांदा त्याला ओळखलं. आणि पोलिसांना याबाबत सूचना दिली. पोलिसांनी आरोपीशिवाय त्या व्यक्तींच्या नावाचा खुलासा केलेला नाही, ज्यांनी त्याच्याकडून खोट्या पद्धतीने प्रमाणपत्र मिळवले आहेत. मात्र यावेळी नेमकं त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. मिळालेल्या माहितीनुसार, तरुणाला 8 वेळा लस घेऊनही काही साइडएफेक्ट झालेला नाही.

हे ही वाचा-गोळी खाऊन घरबसल्या करा कोरोना उपचार; मृत्यूचा धोका कमी, इथे Paxlovid ला मंजुरी

26 डिसेंबरपासून सक्ती वाढणार...

ओमायक्रॉनच्या संकटाखाली बेल्जियममध्ये कोरोना संसर्ग रोखण्यासाठी बरेच प्रयत्न केले जात आहेत. 26 डिसेंबरपासून इंडोर मार्केट, सिनेमागृह, थिएटर आणि कॉन्सर्ट हॉल बंद करण्यात येतील. स्पोर्ट्सचे कार्यक्रम होत राहतील, मात्र येथेही प्रेक्षकांच्या उपस्थितीवर निर्बंध आहेत.

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण आफ्रिकेत (South Africa) ओमायक्रॉन (Omicron) व्हेरिएंटबाबत केलेल्या अभ्यासामुळे दिलासा मिळाला आहे. असं आढळून आलं आहे की, ऑक्‍टोबर ते नोव्‍हेंबरमध्‍ये (October and November), इतर व्हेरिएंटची लागण झालेल्या लोकांच्‍या तुलनेत ओमायक्रॉन संक्रमित लोकांना रुग्णालयात दाखल करण्‍याची शक्यता 80 टक्‍के कमी होती. यासोबत, असेही सांगण्यात आले आहे की काही ठिकाणी हा व्हेरिएंट कमी संसर्गजन्य देखील असण्याची शक्यता आहे.

First published:

Tags: Corona patient, Corona vaccination