Home /News /coronavirus-latest-news /

5-12 वयोगटातील Child Corona vaccination चा मार्गही मोकळा; Corbevax Vaccine ला मंजुरी

5-12 वयोगटातील Child Corona vaccination चा मार्गही मोकळा; Corbevax Vaccine ला मंजुरी

12 पेक्षा कमी वयाच्या लहान मुलांच्या कोरोना लसीकरणाचा मार्गही मोकळा झाला आहे.

    नवी दिल्ली, 21 एप्रिल :  कोरोनाचा धोकाही पुन्हा वाढला आहे. कोरोनाचे नवनवे व्हेरिएंटस (Corona new variant) समोर येत आहेत. कोरोनाची प्रकरणं वाढत आहेत. भारतावर कोरोनाच्या चौथ्या लाटेचं संकट घोंगावत आहे (Corona wave in India). चौथ्या लाटेला कारणीभूत ठरणारा कोरोनाचा नवा व्हेरिएंट हा लहान मुलांसाठी जास्त धोकादायक आहे, असं सांगितलं जातं आहे. त्यामुळे आता मोदी सरकारने तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत. आता 12 पेक्षा कमी वयाच्या लहान मुलांच्या कोरोना लसीकरणाचा मार्गही मोकळा झाला आहे (Children corona vaccination). आतापर्यंत भारतात 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना कोरोना लस दिली जाते आहे (Children Covid Vaccine). पण त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांचं काय? त्यांना कोरोनापासून कसं सुरक्षित ठेवायचं असा प्रश्न पालकांना पडला आहे. पण आता पालकांची ही चिंताही मिटली आहे. कारण  5-12 वयोगटातील मुलांनाही लवकरच कोरोना लस दिली जाणार आहे. कोर्बेवॅक्स (Corbevax Vaccine) या कोरोना लशीच्या आपात्कालीन वापराला केंद्राकडून ग्रीन सिग्नल मिळाला आहे. हे वाचा - कोरोना काळात 18 मंत्र्यांचे खासगी रुग्णालयात उपचार, तब्बल 1 कोटी 40 लाखांचे बिल सरकारच्या माथी ड्रग्ज कंट्रोरल जनरल ऑफ इंडियाच्या (DCGI) एक्सपर्ट कमिटीने 5 ते 12 वयोगटातील मुलांना कोर्बेवॅक्स देण्यास मंजुरी दिली आहे. समितीने डीसीजीआयकडे याबाबत शिफारस पाठवली आहे. आता DCGI कडून मंजुरीची प्रतीक्षा आहे. त्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून अंतिम परवानगी मिळेल. सध्या  12 ते 14 वयोगटातील लहान मुलांना कोर्बेवॅक्स ही लस दिली जाते आहे. भारतात 3 जानेवारीपासून लहान मुलांचं कोरोना लसीकरण सुरू झालं. सुरुवातीला 15 ते वयोगटातील मुलांना लस देण्यात आली. त्यानंतर 16 मार्चपासून 12 ते 14 वयोगटातील मुलांनाही लस देणं सुरू करण्यात आलं. आता लवकरच 5 ते 12 वयोगटातील मुलांचाही यात समावेश होईल. लहान मुलांना Omicron XE व्हेरिएंटचा सर्वात जास्त धोका चौथ्या लाटेला ओमायक्रॉन XE  (Omicron XE) आणि बीए 2 (BA2 variant) हे दोन व्हेरिएंट कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे, असं सांगितलं जातं आहे. कारण हे व्हेरिएंट आतापर्यंतचे सर्वांत जास्त वेगाने प्रसार होणारे व्हेरिएंट आहेत. हे वाचा - Corona Spread : 'या' देशात कोरोनाची स्थिती पुन्हा गंभीर, घराबाहेर पडण्यासही बंदी कोरोनाच्या बीए1 आणि बीए2 या दोन व्हेरिएंट्सचे एकत्रित हायब्रिड असे रूप म्हणजे ओमाक्रॉन XE. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या पूर्वीच्या व्हेरिएंट्सच्या तुलनेत हा व्हेरिएंट 10 पट अधिक संसर्गजन्य (Omicron XE more transmissible) आहे. त्यामुळेच लसीकरण न झालेल्या लोकांसाठी हा विषाणू मोठ्या प्रमाणात घातक ठरू शकतो.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Corona vaccine, Coronavirus

    पुढील बातम्या