Home /News /coronavirus-latest-news /

सोनिया, राहुल गांधी यांनी लस घेतली का? संबित पात्रांच्या प्रश्नाला काँग्रेसनं दिलं उत्तर

सोनिया, राहुल गांधी यांनी लस घेतली का? संबित पात्रांच्या प्रश्नाला काँग्रेसनं दिलं उत्तर

राहुल गांधी, सोनिया गांधी यांना कोरोना प्रतिबंधक लस मिळाली आहे का? असा सवाल भाजप नते संबित पात्रा यांनी कॉंग्रेसला केला होता. आता त्याला काँग्रेसनंही उत्तर दिलं आहे.

    नवी दिल्ली, 17 जून : देशात कोरोना लसीकरणाची प्रक्रिया सातत्यानं सुरू आहे, परंतु लसीकरणाच्या (Corona Vaccination) मुद्द्यावरून राजकारणही तीव्र होत असल्याचे दिसत आहे. परवाच एका काँग्रेसच्या (Congress) नेत्याने भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लशीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं, त्यानंतर भारतीय जनता पक्षानं (BJP) काँग्रेसवर जोरदार हल्ला चढविला. राहुल गांधी (Rahul Gandhi), सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना कोरोना प्रतिबंधक लस मिळाली आहे का? असा सवाल भाजप नते संबित पात्रा यांनी काँग्रेसला केला होता. आता त्याला काँग्रेसनंही उत्तर दिलं आहे. सोनिया गांधींनी ही लस घेतली असून राहुल गांधी मात्र अद्याप लस घेऊ शकलेले नाहीत. वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार, काँग्रेस हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले असल्याचे वक्तव्य काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्यानं केले आहे. मात्र, राहुल गांधींनी अद्याप ही लस घेतलेली नाही, अशी माहिती समोर आली आहे. वास्तविक, राहुल गांधी एप्रिल महिन्यात कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले होते. अशा परिस्थितीत, तीन महिन्यांचा कालावधी पूर्ण होत नसल्याने राहुल गांधी लस घेऊ शकत नाहीत. काँग्रेस नेत्यानं दिलेल्या माहितीनुसार, फक्त याच कारणामुळं राहुल गांधींकडून लस घेण्यास उशीर झाला आहे, असे सांगण्यात आले आहे. सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार एखादा व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर बरे होऊन तीन महिन्यांच्या कालावधीनंतर लस घेऊ शकतो. एप्रिलमध्ये राहुल गांधींना झाला होता कोरोना, बंगालची रॅलीही रद्द केली काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी 20 एप्रिल रोजी ट्वीटद्वारे कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती. मला कोविडची सौम्य लक्षणे दिसल्यानंतरही चाचणी केली असता कोरोना पॉझिटिव्ह आढळली. जे कोणी माझ्या संपर्कात आले आहेत त्यांनी चाचणी करून घ्यावी आणि सुरक्षित रहावे, असे ते म्हणाले होते. हे वाचा - देशातील धक्कादायक वास्तव; कोरोनाच्या पहिल्या लाटेत पतीचं निधन, दुसऱ्या लाटेत नोकरी गेली, 2 महिन्यांपर्यंत 6 जणं अन्नाशिवाय संबित पात्रांनी केला होता प्रश्न काँग्रेसच्या काही नेत्यांनी भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लशीमध्ये वासराचे रक्त मिसळले जात असल्याचा धक्कादायक आरोप केला होता. त्यावरून बराच वाद निर्माण झाला होता. या वादाच्या पार्श्वभूमीवर, भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी पत्रकार परिषद घेतली होती. ज्यामध्ये संबित पात्रा यांनी काँग्रेसचे नेते विशेषत: सोनिया, प्रियंका आणि राहुल गांधी यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे की नाही? असा प्रश्न केला होता. त्यावरून पुन्हा वाद सुरू झाला.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: BJP, Congress, Rahul gandhi, Sonia gandhi

    पुढील बातम्या