मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

Co-Win चा OTP येईना! कोरोना लसीकरणाच्या पहिल्या दिवशी नोंदणीसाठी अडचणी

Co-Win चा OTP येईना! कोरोना लसीकरणाच्या पहिल्या दिवशी नोंदणीसाठी अडचणी

को-विन पोर्टलमध्ये (Co-Win) मध्ये तांत्रिक त्रुटींमुळे लसीकरणासाठी नोंदणी करणाऱ्यांना काही ठिकामी मनस्ताप झाला. अशा वेळी काय करायचं? मुंबईतल्या कोरोना लसीकरण केंद्रावरचं Reality Check

को-विन पोर्टलमध्ये (Co-Win) मध्ये तांत्रिक त्रुटींमुळे लसीकरणासाठी नोंदणी करणाऱ्यांना काही ठिकामी मनस्ताप झाला. अशा वेळी काय करायचं? मुंबईतल्या कोरोना लसीकरण केंद्रावरचं Reality Check

को-विन पोर्टलमध्ये (Co-Win) मध्ये तांत्रिक त्रुटींमुळे लसीकरणासाठी नोंदणी करणाऱ्यांना काही ठिकामी मनस्ताप झाला. अशा वेळी काय करायचं? मुंबईतल्या कोरोना लसीकरण केंद्रावरचं Reality Check

नवी दिल्ली/ मुंबई, 1 मार्च:  केंद्र सरकारच्या वतीने आजपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा (Corona Vaccine) दुसरा टप्पा (Second Phase) सुरू करण्यात आला. देशातील 60 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील व्यक्ती तसेच अन्य आजार असलेल्या 45 वर्षांपेक्षा मोठ्या वयोगटातील व्यक्तींना या टप्प्यात लस दिली जाणार आहे.  को-विन (Co-Win) या प्लॅटफॉर्मवर आजपासून लसीकरणासाठी पात्र नागरिकांकरिता नोंदणी सुरू झाली आहे. पण लसीकरणाच्या नोंदणीबाबत अजूनही अनेक नागरिकांच्या मनात गोंधल आहे. नोंदणी प्रक्रियेतही काही तांत्रिक त्रुटींचा सामना करावा लागत आहे.

Google Play Store वर उपलब्ध असलेलं  Co-Win App हे प्रशासकांसाठी आहे तर नियमित नागरिकांनी नोंदणीसाठी को-विन वेब पोर्टल (Co-Win Web Portal) किंवा को-विन 2.0 हे पोर्टल उपलब्ध आहे.  वापरणे आवश्यक असल्याचे सरकारने स्पष्ट केलं आहे. परंतु, या वेबसाइटमध्ये एकापेक्षा अधिक प्रमाणात त्रुटी असल्याचं दिसून आलं आहे.

अँड्रॉइड स्मार्टफोनसाठी (Android Smart Phones) असलेल्या को-विन या मोबाईल अॅपवरुन व्हेरिफिकेशनच्या (Verification) पहिल्या टप्प्यात युझर्सला ओटीपी (OTP) मिळत नसल्याची तक्रार ऑनलाईन युझर्सकडून केली जात आहे. हे अॅप सामान्य नागरिकांसाठी नाही, परंतु लस नोंदणीच्या अन्य तपशीलांकडे जाण्यापूर्वी व्हेरिफिकेशनसाठी केवळ फोन क्रमांक आवश्यक आहे, हे कारण त्यामागे असू शकतं. न्यूज 18ने आपल्या वाचकांसाठी स्वत: या नोंदणी प्रक्रियेतील विविध पर्याय वापरून पाहिले. आम्ही को-विन अँड्रॉइड फोनव्दारे स्वतःची नोंदणी करण्याचा अनेकदा प्रयत्न केला परंतु, कोणताही ओटीपी आलेला नसल्याचे स्पष्ट झाले. ऑनलाइन पोर्टलवर देखील ओटीपी व्हेरिफिकेशन स्टेजला अडचणी आल्या. येथे ओटीपी पाठवण्यासाठी मोबाईल नंबर समाविष्ट करा या स्टेजच्या पुढे कोणतिही प्रक्रिया होत नसल्याचं दिसून आलं. त्यानंतर आम्ही वेगवेगळ्या ब्राऊजर्झ आणि कॉम्प्युटर्सवरुन वेबपोर्टल वापरण्याचा प्रयत्न केला असता, प्रत्येक प्रयत्नावेळी ओटीपी क्रमांक मिळाला पण प्रक्रिया मोबाईल क्रमांक व्हेरिफिकेशन स्टेजच्या पुढे गेली नाही.

को-विन अँड्रॉइड अॅपवर (Co-Win Android App) मोबाईल क्रमांकाव्दारे नोंदणी होते. मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर युझर्सला अॅपवर प्रशासक म्हणून यशस्वीरित्या नोंदणी करण्यासाठी ओटीपी मिळणे अपेक्षित असते. परंतु सध्या हा ओटीपी युझर्सला मिळत नसल्याचं दिसून आलं आहे. त्यानंतर आम्ही अँड्रॉइड अॅपवरील फरगॉट पासवर्ड या लिंकवर क्लिक करुन नोंदणीमध्ये काही समस्या आहे का तपासण्याचा प्रयत्न केला परंतु, तिथेही आम्हाला कोणाताही ओटीपी मिळाला नाही. याचा अर्थ समस्या ही ओटीपी व्हेरिफिकेशनशी संबंधित असून तिचे तातडीनं निराकरण होणं गरजेचं आहे.

मुंबईच्या कोरोना लसीकरण केंद्रावर News18 Lokmat च्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांनी केलेला रिअॅलिटी चेक

मुंबईत लसीकरणासाठी ज्येष्ठ नागरिकांमध्ये उत्साह दिसून आला. दहिसरमध्ये लसीकरणासाठी सकाळी 9 वाजल्यापासूनच अनेकांनी रांग लावली. पण लसीकरणाची केंद्रसरकारची वेबसाईट सुरूच होत नसल्याने लसीकरण दुपारी साडेबारा नंतर सुरू झालं. या लसीकरण केंद्रावर ना कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण आहे ना अनेक खाजगी रुग्णालयांना तिथे लसीकारण होणार आहे याची माहिती आहे. इथे सगळा सावळा गोंधळ आहे, असा आरोप स्थानिक नगरसेविका शीतल म्हात्रेंनी केला.

वाचा - पंतप्रधान मोदींच्या पाठोपाठ शरद पवार यांनीही घेतली कोरोना लस

दुसरीकडे नागरिक मात्र संयम दाखवत आहेत. 81 वर्षांच्या वयोवृद्ध गृहस्थांनी सकाळपासून लसीकरण केंद्रावर हजेरी लावली होती. त्यांना दुपारी 1 वाजेपर्यंत लसीकरणाची वाट पाहिली.आणि जेव्हा त्यांना लस देण्यात आली तेंव्हा त्यांचे उद्गार होते 'हे सगळं माझ्यासाठी आहे. त्यामुळे मी थोडा धीर, संयम दाखवणं गरजेचं आहे.'

काही लोकांनी को-विनचे वेब व्हर्जन योग्य पध्दतीने काम करीत असल्याचं नमूद केलं आहे तर हे वेब व्हर्जन वापरणाऱ्या काही लोकांनी लसीकरणासाठी स्लॉट बुक करण्यात अडचणी येत असल्याचं म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी आज सकाळी नवी दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमध्ये कोरोना प्रतिबंधक लस घेतल्याचा फोटो प्रसिध्द होताच या वेबसाईटवरील ट्रॅफिक वाढल्याने वेवसाईट क्रॅश झाल्याची तक्रार देखील काही जणांनी केली आहे.

दरम्यान, देशभरात आजपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु झाला आहे. या टप्प्यात 60 वर्षावरील नागरिक तसेच अन्य आजार असलेले 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात देशभरातील आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे.

First published:

Tags: Corona vaccine, Coronavirus