Good News: Oxfordच्या कोरोना लशींच्या चाचण्यांवरची बंदी उठवली, भारतालाही फायदा

Good News: Oxfordच्या कोरोना लशींच्या चाचण्यांवरची बंदी उठवली, भारतालाही फायदा

ऑक्सफर्डने या लशीच्या उत्पादनासाठी पुण्याच्या सीरमची निवड केल्याने त्याचा भारताला मोठा फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

  • Share this:

लंडन 12 सप्टेंबर: सर्व जगाचं लक्ष लागलेल्या AstraZeneca आणि Oxfordने विकसित केलेल्या लशींच्या चाचण्यांवरची बंदी उठविण्यात आली आहे. या लशीच्या मानवी चाचण्यांदरम्यान एका व्यक्तिची प्रकृती बिघडल्याने सरकारने तात्पुरती बंदी घातली होती. ब्रिटनच्या Medicines Health Regulatory Authority (MHRA)ने पुन्हा परवानगी दिल्याचं सांगितलं आहे. या निर्णयाचा संशोधनाला मोठा फायदा होणार असून आता भारतासह जगभरात सुरू असलेल्या चाचण्या पुन्हा सुरू होणार आहेत.

या औषधाच्या चाचण्या या पूर्णपणे सुरक्षीत असल्याचं MHRAने म्हटलं आहे. ब्रिटनमध्ये एका व्यक्तीची प्रकृती बिघडल्याने या चाचण्या थांबिण्यात आल्या होत्या. त्यावर तज्ज्ञांची एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने आपला अहवाल दिला असून त्यात चाचण्या पुन्हा सुरू करण्यास हरकत नाही अशी शिफारस केली आहे.

भारतात पुण्यासह काही शहरांमध्ये या चाचण्या सुरू असून सीरम इन्स्टिट्यूट या लशीचं उत्पादन करणार आहे.

भारत बायोटेक कंपनीला मोठं यश, Covaxinची माकडांवर यशस्वी चाचणी

लस दिलेल्या यूकेतील महिलेच्या पाठीच्या मणक्यातील हाडाला गंभीर सूज आली होती. असं खूप कमी पाहायला मिळतं. त्यामुळेच ट्रायल रोखल्याचं कंपनीने सांगितलं होतं.  बुधवारी अ‍ॅस्ट्रॅजेनेका तर गुरुवारी सीरमने इन्स्टीट्युटनेही या लशीचं ट्रायल थांबवण्याचा निर्णय घेतला होता.

ब्रिटनमध्ये बंदी घाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून सीरमलाही भारतात चाचण्या थांबविण्यास सांगण्यात आलं होतं. जोपर्यंत औषधाच्या सुरक्षेचा निर्वाळा येत नाही तोपर्यंत चाचण्या करू नका असे निर्देश देण्यात आले होते.

आता ब्रिटनमध्ये चाचण्या सुरू होणार असल्याने पुण्यातही चाचण्यांना सुरू होण्याची शक्यता आहे. या चाचण्या बंद झाल्याने संशोधनाला धक्का बसा होता.

विकेण्डला कोरोनाने मोडला रेकॉर्ड, 24 तासांत समोर आली धक्कादायक आकडेवारी

सर्व जगात या संशोधनाबद्दल सर्वात जास्त आशा निर्माण झाली आहे. या आधीच्या चाचण्यांचे परिणाम सकारात्मक आल्याने सगळ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

ऑक्सफर्डने या लशीच्या उत्पादनासाठी पुण्याच्या सीरमची निवड केल्याने त्याचा भारताला मोठा फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: September 12, 2020, 7:59 PM IST

ताज्या बातम्या