नवी दिल्ली, 25 सप्टेंबर : कोरोना विषाणूशी दोन हात करत असताना आता ब्रुसेलोसीस या नव्या विषाणूचं संकट घोंगावत आहे. आता हा नवा विषाणू आढळून आला आहे. चीनमध्येच या विषाणूचे अनेक रुग्ण आढळून आले होते. या विषाणूच्या संसर्गाबाबत आता भारताला अधिक सावध राहण्याची गरज निर्माण झाली आहे. भारतात प्राणी आणि माणसामध्ये या विषाणूची लागण झाल्याचा धोका असून कोरोना सोबतच या महामारीच्या संकटाचा सामाना करावा लागेल अशी भीती संशोधकांनी व्यक्त केली आहे.
जगभरात कोरोना विषाणूने अक्षरश: थैमान घातलं आहे. 3 कोटींहून अधिक लोकांना याची लागण झाली असून, 9 लाखांपेक्षा अधिक रुग्णंचा जगभरात मृत्यू झाला आहे. भारतातही कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरला असून भारतातही 50 लाख लोकांना लागण आणि 91 हजारांवर रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भारत आधीच या संकटाचा सामना करत आहे. त्यातच ब्रुसेलोसीस हा नवा विषाणू चीनमधील होरिझोनमध्ये आढळून आला आहे.
हे ही वाचा-नवरात्र आणि दसरा सणाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं महत्त्वाचं आवाहन
शास्रज्ञांच्या म्हणण्यानुसार हा नव्या प्रकारचा विषाणू आहे. जो प्रामुख्याने गुरं, शेळ्या, मेंढ्या आणि कुत्र्यांमध्ये आढळून येतो आणि लागण झालेल्या प्राण्यांच्या थेट संपर्कात आल्यास माणसांना याची लागण होऊ शकते, यासह लागण झालेल्या प्राण्यांपासून मिळणाऱ्या उत्पादानांचे सेवन केल्यांस किंवा त्या परिसरातील हवा श्वासोच्छवासावाटे शरीरात गेल्यास या विषाणूचा संसर्ग होऊ शकतो, असे संशोधकांचं मत आहे.
हे ही वाचा-जुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कामगिरी
चीनमधील लॅनझुवा या शहरात प्रथम ब्रुसेलोसिसच्या केसेस आढळून आल्या होत्या. गेल्या वर्षी या विषाणूच्या संसर्गामुळे एक औषध उत्पादन कंपनी बंद करण्यात आली होती. तीन हजार लोकांना याची बाधा झाली होती. यात कोणाचाही मृत्यू झाला नव्हता. नुकत्याच काही निष्कर्षांनुसार हा विषाणूजन्य आजार भारतात दाखल झाला असून त्यामळे प्राणी आणि माणसांनाही संसर्ग झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर आता ही आणखी एक महामारी ठरून याचा धोका उद्भवण्याची भीती शास्रज्ञांनी व्यक्त केली आहे.
काय आहेत आजाराची लक्षणं
ताप, डोकेदुखी, श्वास घेण्यास त्रास, अंगदुखी अशी काही या आजाराची लक्षणं आहेत. या आजाराची लक्षणं अधिक काळ राहू शकतात शिवाय ती कधीच जात नाहीत, असाही धोका आहे. यासह या विषाणूमुळे हृदय, किडनी, यकृतांवर सूज येण्याची शक्यता असते. जनावरांशी थेट संपर्क, पाश्चराइज न केलेलं दूध पिणं किंवा जनावरांच्या जखमांच्या माध्यमातूनही या विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. भारतात कृषीसोबतच पशुपालन हा महत्त्वाचा व्यवसाय आहे. यावर अनेक जण अवलंबून आहेत. त्यामुळे भारतात हा आजार पसरण्याचा अधिक धोका शास्रज्ञांना वाटतो. थेट प्राण्यांशी माणसांचा नियमित येणारा संपर्क किंवा त्यांच्यापासून मिळणाऱ्या पदार्थांचे सेवन हा या विषाणीची लागण होण्याची प्रमुख माध्यमे आहेत.
Published by:Meenal Gangurde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.