Home /News /coronavirus-latest-news /

'प्रकरण दडपण्यात WHO सहभागी', कोरोना व्हायरस मानवनिर्मित असल्याचा दावा करणाऱ्या शास्त्रज्ञाचा गंभीर आरोप

'प्रकरण दडपण्यात WHO सहभागी', कोरोना व्हायरस मानवनिर्मित असल्याचा दावा करणाऱ्या शास्त्रज्ञाचा गंभीर आरोप

चिनी सरकारला कोव्हिड -19 च्या संक्रमणाबद्दल माहित होते आणि जागतिक आरोग्य संघटना देखील या प्रकरणाच्या 'कव्हर अप'चा भाग आहे. असा आरोप चिनी व्हायरोलॉजिस्ट ली-मेंग यान (Li-Meng Yan) यांनी केला आहे.

    मुंबई, 23 सप्टेंबर : चिनी व्हायरोलॉजिस्ट ली-मेंग यान यांनी (Li-Meng Yan) पुन्हा एकदा बोलताना सांगितले की चीनने वुहान लॅबमध्ये कोव्हिड-19'ची निर्मिती केली आहे. चीनमधून बाहेर पडलेल्या चिनी व्हायरोलॉजिस्ट यान यांनी जाहीरपणे असा दावा केला होता की तिच्याकडे SARS-Covid-2 व्हायरस मानवनिर्मित असून तो वुहान लॅबमध्ये तयार करण्यात आल्याचा पुरावा आहे. WIONला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी असे म्हटले आहे की, चिनी सरकारला कोव्हिड -19 च्या संक्रमणाबद्दल माहित होते आणि जागतिक आरोग्य संघटना देखील या प्रकरणाच्या 'कव्हर अप'चा भाग आहे. हे प्रकरण दडपण्यात WHO चा हात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्या असे म्हणाल्या की, "व्हायरसचा प्रारंभ बिंदू मानला जाणारा वुहान मांस बाजार म्हणजे चिनी कम्युनिस्ट पक्षासाठी स्मोकस्क्रीन आहे'. अर्थात यान यांच्या मते वुहान मांस बाजाराचे कारण केवळ इतरांची दिशाभूल करण्यासाठी वापरण्यात आले. चीन सरकार सोशल मीडियाच्या माध्यमातून यान यांची प्रतिष्ठा बिघडवण्याचा प्रयत्न करीत असून चीनमधील तिच्या कुटुंबीयांना धमकावण्यासाठी तिच्यावर सायबर-हल्ले करीत असल्याचा दावाही यान यांनी केला आहे. (हे वाचा-Air Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा) दरम्यान आश्चर्यकारक बाब म्हणजे यान यांचे ट्विटर अकाउंटही नुकतेच निलंबित करण्यात आले. त्यांच्या ट्विटर पेजवरील मेसेजमध्ये लिहिले आहे की, 'अकाऊंट निलंबित करण्यात आले आहे. ट्विटरने ट्विटर नियमांचे उल्लंघन करणारी अकाऊंट्स निलंबित केली आहेत'. मे मध्ये ट्विटरने 'कोरोना व्हायरस संदर्भातील विवादित दाव्यांमुळे त्यांचे ट्वीट्स फ्लॅग करण्यास सुरुवात केली होती. यान यांनी अशी माहिती दिली होती की, हॉंगकॉंग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थमध्ये काम करत असताना, तिच्या पर्यवेक्षकाने तिला 31 डिसेंबर रोजी वुहानमध्ये नवीन सार्स सारख्या विषाणूची तपासणी करण्यास सांगितले होते. परंतू कालांतराने तिचे संशोधन थांबविण्यात आले. संक्रमण वेगाने होत असताना देखील यान यांना 'शांत रहा आणि काळजी घ्या' असे वारंवार सांगण्यात आल्याचेही यान यांनी म्हटले होते. शहरातील व्हायरलॉजी लॅबमधून हा विषाणू आला आहे याचा पुरावा आपल्याकडे असल्याचेही त्यांनी सांगितले (हे वाचा-'...तर कोरोना पसरलाच नसता!', चीन आणि WHOची पोलखोल करणारा रिपोर्ट आला समोर) ली मेंग या हॉंगकॉंग सोडून अमेरिकेत स्थिर झाल्या आहे. चिनी सरकारने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांनी अमेरिकेत स्थलांतरित झाल्या. चिनी सरकारने ली मेंग यांची संपूर्ण माहिती ही गायब केली आहे. याआधी, ली मेंग यांना चीन सरकावर आरोप केला होता. कोरोना व्हायरसविषयी जगाला सांगण्या पूर्वीच त्यांना माहित होते. हे देखील सरकारच्या उच्च स्तरावर करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले होते.  चीनने कोरोनाविषयी माहिती लपवली आहे, असाही आरोप त्यांनी केला होता.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या