Home /News /coronavirus-latest-news /

'वुहानच्या लॅबमधूनच झाला Coronavirus चा प्रसार', चिनी शास्त्रज्ञानं दिला पुरावा

'वुहानच्या लॅबमधूनच झाला Coronavirus चा प्रसार', चिनी शास्त्रज्ञानं दिला पुरावा

चीनमधील एका प्रसिद्ध व्हायरोलॉजिस्टने म्हटले, तिच्याकडे पुरावे आहेत आणि हा व्हायरस मानवनिर्मित असल्याचे ती सिद्ध करू शकते.

    पेइचिंग, 14 सप्टेंबर : जगभरात 2 कोटींहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आहेत. चीनच्या वुहानमधूनच कोरोना पसरल्याचा आरोप अजूनही जगभरातील अनेक देश करत आहेत. आता चीनमधील एका प्रसिद्ध व्हायरोलॉजिस्टने म्हटले, तिच्याकडे पुरावे आहेत आणि हा व्हायरस मानवनिर्मित असल्याचे ती सिद्ध करू शकते. हाँगकाँग स्कूलचे चीनचे व्हायरोलॉजिस्ट डॉ. ली-मेंग यान यांनी असा दावा केला आहे की, कोरोनाचा प्रसार होण्यास सुरू झाली नव्हती तेव्हा पेइचिंगमध्ये कोरोनाबाबत माहितीही मिळाली होती. हा दावा केल्यापासून ली-मेंग या जीव वाचवण्यासाठी पळत आहेत. नुकत्याच ली-मेंग या Loose Women या कार्यक्रमात आल्या होत्या, त्यावेळी त्यांनी दावा केला की चिनी सरकारने तिची सर्व माहिती सरकारी डेटाबेसमधून काढून टाकली आहे. डॉ. यान यांनी दावा केला आहे की वुहान मार्केटमध्ये कोव्हिड-19 पसरल्याची बातमी म्हणजे एक फसवणूक आहे. तसेच, यान या एक रिपोर्ट प्रकाशित करणार आहे ज्यात हा व्हायरस मानवनिर्मित असल्याचे पुरावे सादर केले जाणार आहेत. डॉ. यान जीव वाचवण्यासाठी सध्या अमेरिकेत आहेत. वाचा-कोरोनाचं रुप पुन्हा बदललं, आता डेंग्यू तापाप्रमाणे रुग्णांमध्ये दिसली लक्षणं 'व्हायरस वुहान लॅबमधून आला आहे' डॉ. यान म्हणाल्या की, 'पहिली गोष्ट म्हणजे वुहानचा मांस बाजार एक पडदा म्हणून वापरला जात आहे आणि हा व्हायरस नैसर्गिक नाही आहे'. तसेच, व्हायरस नक्की कुठून आला हे विचारले असता त्यांनी वुहानच्या लॅबमधून आल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या की, 'जीनोम सीक्वेन्स हा मानवी फिंगर प्रिंट सारखा आहे. हे या आधारावर ओळखले जाऊ शकते. या पुराव्याच्या आधारे, मी लोकांना सांगेन की कोरोना हा चीनच्या लॅबमधून कसा आला. वाचा-अमेरिकेतील तज्ज्ञाने सांगितली कोरोना लशीची खरी परिस्थिती; किमान एक वर्ष तरी... 'चीनने काढून टाकली त्यांनी माहिती' डॉ. यान यांनी असाही दावा केला की, त्यांनी माहिती चीनच्या डेटाबेसमधून काढून टाकण्यात आली आहे. त्याच्या सहकार्‍यांना त्याच्याबद्दल खोटी बातमी पसरण्यास सांगितले गेले आहे. डॉय यान या कोरोनाव्हायरसचा अभ्यास करणाऱ्या पहिल्या वैज्ञानिक आहेत. त्यांनी असा दावा केला आहे की डिसेंबर 2019 च्या उत्तरार्धात, त्यांच्या विद्यापीठाच्या पर्यवेक्षकाने त्याला SARS सारख्या केस क्लस्टर्सकडे जाण्यास सांगितले आहे. डॉ. यान यांनी असेही सांगितले की, कोरोनाचा वाढता प्रसार आणि लोकांचा मृत्यू होत असतांना लोकांपर्यंत सत्य पोहोचवण्याची नैतिक जबाबदारी आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Corona virus in india, Coronavirus

    पुढील बातम्या