Home /News /coronavirus-latest-news /

कोरोनासंदर्भात लावलेले शोध हे फक्त हिमनगाचं टोक; चीनच्या बॅट वूमनचा दावा

कोरोनासंदर्भात लावलेले शोध हे फक्त हिमनगाचं टोक; चीनच्या बॅट वूमनचा दावा

कोरोना व्हायरससंदर्भात (CoronaVirus) आपण जे शोध लावले आहेत ते फक्त हिमनगाचं एक टोक आहे. अजून बरंच संशोधन बाकी आहे असा दावा चीनच्या विषाणू शास्त्रज्ञ शी झेंगली अर्थात बॅट वूमन यांनी केला आहे.

    बिजिंग, 23 नोव्हेंबर: चीनमधील विषाणू शास्त्रज्ञ शी झेंगली यांनी कोरोना संदर्भात नवीन खुलासा केला आहे. कोरोना व्हायरस (Corona Virus) तिच्या प्रयोगशाळेतून जगात पसरला नसल्याचे तिने म्हटले आहे. तसा पुरावा ती दाखवत आहे. चीनमध्ये बॅट वूमन या नावाने प्रसिद्ध असलेल्या या महिला शास्त्रज्ञाच्या या नवीन दाव्यामुळे नवीन प्रश्न निर्माण झाले आहेत. नेचर आणि एक्सपांड या वैज्ञानिक जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, फेब्रुवारीमध्ये तिच्या लॅबमध्ये झालेल्या संशोधनातून कोरोना हा तिच्या लॅबमधून पसरला नसल्याचे पुढे आले आहे. साउथ चायना मॉर्निंग पोस्ट वृत्तपत्राच्या माहितीनुसार, वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी येथील उदयोन्मुख संसर्गजन्य रोगाच्या केंद्र प्रमुख असलेल्या शी म्हणाल्या, आठ वर्षांपूर्वी एका आजाराने संसर्ग झालेल्या खाण कामगारांकडून चाचणी करण्यात आलेल्या नमुन्यांमधून हे सिद्ध होते की त्यांना SARS-CoV-2 चे संक्रमण झाले नव्हते. 2012 मध्ये युनान प्रांतातील तांब्याच्या खाणीत वटवाघुळांची घाण साफ करणाऱ्या कामगारांना श्वसनाचा आजार झाला होता. या संशोधनात या आजाराचे कारण तपासण्यासाठी या पथकाने 2012 ते 2015 दरम्यान गुहेजवळील अनेक प्राण्यांचे नमुने घेतले होते. या विषाणूचे मूळ शोधण्यासाठी त्यांनी वटवाघुळ, उंदिर आणि चिचुंद्रीचे नमुने तपासले होते. अहवालानुसार तिच्या टीमला 2012 मध्ये RaTG13, नावाच्या वटवाघळामध्ये  कोरोना व्हायरस सापडला होता. त्यानंतर शी यांनी या चार खाण कामगारांकडून घेतलेले 13 नमुने पुन्हा तपासले आणि त्यांना SARS-CoV-2 संसर्ग नसल्याचे आढळले. शी यांच्या प्रयोगशाळेतून कोरोना विषाणू जगभर परसरला हा केला जाणारा दावा खोटा असल्यलाचं या संशोधनातून सिद्ध होत आहे. कोरोना व्हायरसमुळे जगभरात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले असून आतापर्यंत कोट्यवधी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या फेब्रुवारीच्या पेपरमध्ये शी म्हणाल्या होत्या, RaTG13 चा अनुवांशिक क्रम 96 टक्के SARS-CoV-2 सारखा होता. यापूर्वी मे 2020 मध्ये शी यांनी चीनमधील सीजीटीएन टीव्हीवर येत त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांचे खंडन केलं होतं. त्याचबरोबर विज्ञानाचे राजकारण केले गेल्याचे देखील त्यांनी त्यावेळी म्हटले होते. दरम्यान, त्यांनी कोरोना व्हायरससंदर्भात लावलेले शोध केवळ हिमनगाचे एक टोक असल्याचे म्हटले होते. जर संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्यापासून बचाव करायचा असेल तर प्राण्यांपासून होणाऱ्या संसर्गाचा अभ्यास करणे आणि त्यापासून बचाव करण्यासाठी शिकणे गरजेचे असल्याचे देखील म्हटले होते.
    Published by:Amruta Abhyankar
    First published:

    Tags: Covid19

    पुढील बातम्या