Home /News /coronavirus-latest-news /

टॉयलेटमधूनही पसरतोय कोरोना? संसर्ग रोखण्यासाठी क्रू मेंबर्सनी वापरला 'हा' पर्याय

टॉयलेटमधूनही पसरतोय कोरोना? संसर्ग रोखण्यासाठी क्रू मेंबर्सनी वापरला 'हा' पर्याय

सोशल डिस्टंसिन्ग, नियमित मास्कचा वापर आणि वारंवार हात धुणे या कोरोना पासून बचावासाठी प्रमुख त्रिसूत्री आहेत. पण आता कोरोनाचा संसर्ग टॉयलेट मधूनही होऊ शकतो अशी शंका चीनने त्याच्या नव्या गाईडलाईन्स मधून दर्शवली आहे.

    बीजिंग, 11 डिसेंबर : कोरोना विषाणू कसा आणि कुठून पसरतो याबाबत वैज्ञानिकांमध्ये आजही मतभेद आहेत. या पार्श्वभूमीवर चीनमध्ये (China)  आता कोरोनाचा (Corona Virus) प्रसार रोखण्यासाठी नवीन मार्गदर्शक सूचना (New Guidelines) जारी करण्यात आल्या आहेत. यामध्ये विमान कंपन्यांचे (Airlines) कर्मचारी विशेषतः क्रू मेंबर्ससाठी (Crew Members) काही विशेष सूचना दिल्या आहेत. सीजीटीएनच्या वृत्तानुसार, टॉयलेटमधूनही कोरोना पसरण्याचे पुरावे मिळाल्याची चर्चा या नव्या सूचनेमुळे  सुरू झाली आहे. तब्बल 38 नव्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. विशेषतः दहा लाख लोकांमागे 500 पेक्षा जास्त संक्रमित लोक आहेत, अशा ठिकाणी जाणाऱ्या क्रू मेंबर्ससाठी या सूचना देण्यात आल्या आहेत.विमानप्रवासादरम्यान, एअर होस्टेस आणि क्रू मेंबर्सनी विमानातील टॉयलेट (Toilet) वापरू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यांनी डायपरचा वापर करावा असा सल्ला चीनच्या नागरी हवाई उड्डाण नियंत्रक संस्थेनं दिला आहे. डायपरचा समावेश वैयक्तिक सुरक्षा साधनांच्या यादीत करण्यात आला आहे. फक्त केबिन क्रू मेंबर्सना डायपर वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, विमानातील सर्व क्रू मेंबर्सना मास्क, दुहेरी आवरणाचे डिस्पोजेबल मेडिकल रबर ग्लास, चष्मे, डिस्पोजेबल कॅप, डिस्पोजेबल कपडे आणि शू कव्हर वापरण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. विमानातील केबिन एरियातून कोरोना विषाणूचा संसर्ग होत असल्याच्या अनेक घटना दिसून आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर चीनमध्ये विमान प्रवास सुरक्षित करण्याच्या दृष्टीनं अनेक पावलं उचलण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने नवीन मार्गदर्शक सूचना तयार करण्यात आल्या आहेत. कॉकपिटमध्ये बसणाऱ्या वैमानिकांना संसर्ग होऊ नये याची दक्षता यात घेण्यात आली आहे.  केबिन एरियाला बफर झोन बनवण्याची सूचना देण्यात आली असून, हा एरिया स्वच्छ ठेऊन, इथं पडदे लावून क्वारन्टाईन एरियात रुपांतर करण्यास सांगण्यात आलं आहे. यामुळे प्रवाशांकडून केबिन क्रू मेंबर्सना संसर्ग होऊ नये यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. विमानातील शेवटच्या तीन सीटसही पडदे लावून हा वेगळा भाग तयार करण्यात येणार असून तातडीच्या वेळी क्वारन्टाईन एरिया म्हणून त्याचा वापर करण्यात येणार आहे. हे वाचा-14 वर्षांच्या स्वरुपला होते पबजी गेमचे वेड, राहत्या घरात घेतला गळफास कोविड 19च्या साथीमुळे चीनच्या विमान सेवा क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे. चीनमधील वुहान प्रांतात प्रथम कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला आणि तिथून तो सर्वत्र पसरला. यानंतर चीनला मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमान उड्डाणं रद्द करावी लागली होती. आता सुरक्षिततेचे नियम पाळून विमान कंपन्यांनी विमान फेऱ्या सुरू केल्या आहेत. विमानांमध्ये हॉस्पिटलमधील दर्जाचे एअर फिल्टर्स लावण्यात आले आहेत. मास्क घालून आणि सोशल डिस्टन्सिंग पाळूनदेखील कोरोना संसर्ग झाल्याच्या काही घटना उघडकीस आल्या आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Corona, Covid19, Social distancing

    पुढील बातम्या