Home /News /coronavirus-latest-news /

NeoCov: कोरोनानंतर आणखी एका धोकादायक विषाणूची दहशत, तीन पैकी एकाचा होऊ शकतो मृत्यू!

NeoCov: कोरोनानंतर आणखी एका धोकादायक विषाणूची दहशत, तीन पैकी एकाचा होऊ शकतो मृत्यू!

NeoCov: चिनी संशोधकाच्या मते, हा विषाणू खूप धोकादायक आहे. NeoCoV ची लागण झालेल्या प्रत्येक 3 पैकी एकाचा मृत्यू होत आहे. तो कोरोनापेक्षाही वेगाने पसरतो, असंही सांगण्यात आलं आहे.

    नवी दिल्ली, 28 जानेवारी : कोरोना विषाणू (Corona) च्या विविध प्रकारांमुळं () संपूर्ण जग चिंतेत आहे. दरम्यान, आता आणखी एका नवीन विषाणूनं एन्ट्री केली आहे. हा कोरोनापेक्षाही धोकादायक असल्याचं बोललं जात आहे. विशेष म्हणजे चीनच्या वुहान लॅबच्या वैज्ञानिकांनी या विषाणूबाबत इशारा दिला आहे. नोव्हेंबर 2019 मध्ये वुहानमधूनच कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. हा नवीन विषाणू दक्षिण आफ्रिकेत आढळला आहे. असं सांगितलं जात आहे की, प्रत्येक 3 संक्रमित लोकांपैकी एकाचा मृत्यू होत आहे. तसंच हा विषाणू खूप वेगानं पसरत असल्याची माहिती मिळाली आहे. या नवीन विषाणूला सध्या NeoCov असं नाव देण्यात आलं आहे. रशियन न्यूज एजन्सी स्पुटनिकच्या मते, NeoCov हा नवीन व्हायरस नाही. हा MERS-CoV विषाणूशी संबंधित आहे. हा विषाणू 2012 आणि 2015 मध्ये मध्यपूर्वेतील देशांमध्ये पहिल्यांदा सापडला होता. हा SARS-CoV-2 सारखा आहे. त्यामुळं हाही कोरोना विषाणूप्रमाणं मानवांमध्ये पसरतो. हा विषाणू कुठे आणि कसा पसरतो? मिळालेल्या माहितीनुसार, सध्या दक्षिण आफ्रिकेतील वटवाघळांमध्ये या विषाणूचे काही अंश सापडले आहेत. सध्या या प्राण्यांमध्येच त्याचा प्रसार होत आहे. पण तो मानवांमध्येही पसरू शकतो, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. बायोरेक्सिव (bioRxiv) वेबसाइटवर प्रकाशित केलेल्या एका नवीन अभ्यासात असं दिसून आलं आहे की, NeoCoV आणि त्याच्यासारखेच इतर विषाणू PDF-2180-CoV मानवांना संक्रमित करू शकतात. हे वाचा - Foot Care Tips For Men : थंडीत फुटलेल्या टाचा अधिकच त्रास देतात; या घरगुती उपायांचा परिणाम दिसेल जालीम मानवाला संसर्ग होण्याचा धोका किती? वुहान युनिव्हर्सिटी आणि चायनीज अॅकॅडमी ऑफ सायन्सेसच्या इन्स्टिट्यूट ऑफ बायोफिजिक्सच्या संशोधकांच्या मते, मानवी पेशींमध्ये विषाणूनं प्रवेश करण्यासाठी त्या विषाणूमध्ये फक्त एक उत्परिवर्तन होणं आवश्यक आहे. असं झाल्यास हा विषाणू मानवांना संक्रमित करू शकतो. संशोधनाच्या निष्कर्षांमध्ये असं नमूद केलं आहे की, कोरोना विषाणू हा रोगजनकापेक्षा काहीसा वेगळा आहे. त्यामुळं तो मानवांना संक्रमित करतो. ACE2 रिसेप्टर या विषाणूला वेगळं गुणधर्म देतो. हीच बाब नवीन NeoCoV बाबतीत खरी ठरल्यास तोही मानवांना धोका पोहोचवू शकतो. त्यामुळं, कोरोना विषाणूविरोधातील अँटीबॉडीज असणारे लोक असोत किंवा चांगली रोगप्रतिकार शक्ती असलेले लोक असोत किंवा श्वसनाचे आजार असलेले लोक असोत, NeoCoV च्या तडाख्यातून कोणीही सुटू शकणार नाही. हे वाचा - ही आहेत Omicron ची सर्व 14 लक्षणं; सर्वात कमी आणि सर्वात जास्त वेळा दिसलेले Symptoms अत्यंत धोकादायक चिनी संशोधकाच्या मते, हा विषाणू खूप धोकादायक आहे. NeoCoV ची लागण झालेल्या प्रत्येक 3 पैकी एकाचा मृत्यू होत आहे. तो कोरोनापेक्षाही वेगाने पसरतो, असंही सांगण्यात आलं आहे. अहवालात म्हटलं आहे की, NeoCoV वर चीनकडून दिलेल्या माहितीनंतर, रशियन स्टेट व्हायरोलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटरच्या तज्ज्ञांनी गुरुवारी एक निवेदन जारी केलं. या विषाणूवर लक्ष ठेवण्यात येत असल्याचं निवेदनात म्हटलं आहे. तसंच याबाबत अधिक अभ्यासाची गरज आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Corona, Virus

    पुढील बातम्या