मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /येत्या काळात पुन्हा 'हे' देश ठरु शकतात विषाणूजन्य रोगांचे हॉटस्पॉट्स, शास्त्रज्ञांचा इशारा

येत्या काळात पुन्हा 'हे' देश ठरु शकतात विषाणूजन्य रोगांचे हॉटस्पॉट्स, शास्त्रज्ञांचा इशारा

उल्हासनगर येथील बालसुधारगृहात शिक्षा भोगत असलेल्या 14 मुलांना कोरोनाची बाधा झाली आहे.

उल्हासनगर येथील बालसुधारगृहात शिक्षा भोगत असलेल्या 14 मुलांना कोरोनाची बाधा झाली आहे.

कोरोना विषाणू (corona virus)चा माणसातला संसर्ग नेमका कशामुळे झाला, याचं कारण अद्याप नेमकं स्पष्ट झालेलं नसलं, तरी वटवाघळांमधून तो माणसांमध्ये आला अशा थिअरीला बऱ्यापैकी मान्यता मिळाली आहे.

कॅलिफोर्निया, 03 जून: कोरोना विषाणू (coronaviruses) ने गेलं दीड वर्ष जगभर थैमान घातलं आहे. या कोरोना विषाणूचा माणसातला संसर्ग नेमका कशामुळे झाला, याचं कारण अद्याप नेमकं स्पष्ट झालेलं नसलं, तरी वटवाघळांमधून तो माणसांमध्ये आला अशा थिअरीला बऱ्यापैकी मान्यता मिळाली आहे. ती आधारभूत मानून केलेल्या पुढच्या एका संशोधनात असं आढळलं आहे की, चीन, (China) आग्नेय आशिया (Southeast Asia) आदी प्रदेशांत वटवाघळांच्या वाढीसाठी अनुकूल वातावरणनिर्मिती होत आहे. त्यामुळे कोरोना विषाणू तसंच अन्य विषाणूजन्य रोगांचा प्रसार वटवाघळांतून माणसांमध्ये होण्याच्या दृष्टीने ही स्थिती अनुकूल असून त्यासाठीचे हॉट-स्पॉट्स तिथे तयार होत आहेत. जंगलांची कमी होत चाललेली संख्या, शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या जमिनीचा विस्तार आणि पशुपालनाचं केंद्रीकरण आदी बाबींमुळे हे बदल होत आहेत, असं निरीक्षण या संशोधनादरम्यान नोंदवण्यात आलं आहे. नेचर फूड नावाच्या विज्ञानपत्रिकेत प्रकाशित झालेल्या संशोधनाच्या आधारे 'अमर उजाला', तसंच 'फर्स्ट पोस्ट'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

बर्कले येथील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, पॉलिटेक्निक युनिव्हर्सिटी ऑफ मिलान, न्यूझीलंडमधील मॅसी युनिव्हर्सिटी या संस्थांमधल्या शास्त्रज्ञांनी हे संशोधन केलं आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग वटवाघळांमधून माणसांत झाला असावा, ही थिअरी शास्त्रज्ञांनी मांडली आहे. तो थेट झाला असावा किंवा खवले मांजरासारख्या मध्यस्थ प्राण्याच्या माध्यमातून झाला असावा, अशीही शक्यता शास्त्रज्ञांना संशोधनातून आढळली आहे. हॉर्सशू बॅट्स अर्थात घोड्याच्या नालेसारखा आकार असणारी वटवाघळं वेगवेगळ्या प्रकारच्या कोरोना विषाणूंची वाहक आहेत. त्यात कोविड-19 किंवा सार्ससारख्या रोगांना कारणीभूत असलेल्या कोरोना विषाणूंशी जनुकीय साधर्म्य असलेल्या कोरोना विषाणूंचाही समावेश आहे.

हेही वाचा- सावधान! 'कोरोनाची तिसरी लाटही गंभीर, 98 दिवस असेल धोका'

रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाच्या साह्याने शास्त्रज्ञांनी पश्चिम युरोपपासून आग्नेय आशियापर्यंतच्या भौगोलिक प्रदेशात होणाऱ्या जमीन वापराच्या पॅटर्न्सचा अभ्यास केला. जंगलांची घटती संख्या, मानवी वस्तीच्या वाढत्या जागा आणि वटवाघळांचे अधिवास यांची तुलना करून शास्त्रज्ञांनी वटवाघळांच्या अधिवासासाठी अनुकूल ठरू शकणाऱ्या संभाव्य प्रदेशांचा अंदाज बांधला. ते संभाव्य प्रदेश वटवाघळांसाठी हॉट-स्पॉट्स ठरू शकतील. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून माणसांमध्ये झूनॉटिक प्रकारच्या विषाणूंचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं विश्लेषण शास्त्रज्ञांनी केलं आहे.

हे हॉटस्पॉट्स चीन, जपान, फिलिपिन्स, थायलंड आदी देशांमध्ये असतील, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. मनुष्याचं पर्यावरणावर होत असलेलं अतिक्रमण घातक असल्याचा निष्कर्ष या संशोधनातूनही निघाला असून, असं अतिक्रमण कमीत कमी करणं हेच श्रेयस्कर असल्याचा इशारा यातून पुन्हा एकदा माणसाला मिळाला आहे.

हेही वाचा- सिंधूनं जिंकलं मन, रिओमध्ये पराभूत करणाऱ्या खेळाडूबाबत म्हणाली...

दरम्यान, B.1.617 हा कोरोनाचा एकमेव व्हॅरिएंट अद्याप धोकादायक असून, अन्य दोन व्हॅरिएंट्सचा धोका आता कमी झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं हे दिलासादायक वृत्त दिलं आहे. कोरोनाचा या घातक व्हॅरिएंट म्हणजे ट्रिपल म्युटंट व्हॅरिएंट म्हणून ओळखला जातो.

First published:

Tags: China, Corona virus in india, Coronavirus