• Home
  • »
  • News
  • »
  • coronavirus-latest-news
  • »
  • चीनला नाही स्वतःच्याच कोरोना लशीवर भरवसा; दोन डोस घेतलेल्यांना आता जर्मन बूस्टर शॉट देणार

चीनला नाही स्वतःच्याच कोरोना लशीवर भरवसा; दोन डोस घेतलेल्यांना आता जर्मन बूस्टर शॉट देणार

चीनची कोरोना लस (Corona vaccine in China) वापरणार्‍या देशांमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला आहे.

  • Share this:
बीजिंग, 20 जुलै: कोविड-19 (Covid-19) महासाथीची सुरुवात चीनमधून (China) झाली. कोरोना प्रतिबंधात्मक लशीवर संशोधन सर्वप्रथम चीनमध्येच (China corona vaccine) सुरू झालं आणि कोरोनावर परिणामकारक अशी लस (Corona Vaccine in China) बनवल्याचा दावासुद्धा सर्वप्रथम चीननेचं (Made in china corona vaccine) केला. मात्र सध्या चीनला स्वतःच्याच कोरोना लशीवर (Corona vaccination in China) विश्वास राहिलेला नाही. म्हणूनच आता लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांना बूस्टर डोस (Booster Dose) देण्याची तयारी चीन करत आहे. अहवालानुसार, चीनमध्ये ज्यांनी चीनची लस घेतली आहे त्यांना बूस्टर डोस म्हणून कॉमिरनाटी (Comirnaty) नावाची लस देण्याचा विचार चीन करत आहेत. फोसुन फार्मा (fosun pharma) आणि जर्मनीच्या बायोएनटेकच्या (BioNTech) mRNA या लशीचा बूस्टर डोस दिला जाईल. ही लस सामान्यत: अमेरिका आणि युरोपमध्ये वापरली जात आहे. चीनमध्ये ही लस तयार करण्याचे आणि वितरित करण्याचे विशेष अधिकार फोसुन यांच्याकडे आहेत. सध्या BioNTech च्या लशीला चीन सरकारची मान्यता मिळणं बाकी आहे. ही लस कोरोनाविरूद्ध 95% पर्यंत प्रभावी आहे, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. हे वाचा - कोरोना लस घेतल्यानंतर 5 तासांतच मारला लकवा! आता डोळाही बंद होईना चीनची लस वापरणार्‍या देशांमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला आहे. मंगोलिया, सेशेल्स आणि बहरेनसारख्या देशांमध्ये कोरोनाच्या केसेस वाढत आहेत. या देशांमध्ये लोकांना चीनची लस देण्यात आली आहे.  न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार, चीनमध्ये तयार केलेली ही लस कोरोना विषाणूच्या नवीन व्हेरिएंट  (Variant) विरोधात प्रभावी नाही. 'अवर वर्ल्ड इन ट्रॅकिंग' या डेटा ट्रॅकिंग प्रोजेक्टनुसार कोविड-19 ला रोखण्यामध्ये दहा सर्वात मागे राहिलेल्या देशांमध्ये चीनचा समावेश आहे. हे वाचा - सावध व्हा! कोरोनाच्या पार्श्वभूमीवर WHO नं पुन्हा दिला इशारा हाँगकाँग युनिव्हर्सिटीचे व्हायरॉलॉजिस्ट (Virologist) जिन डोंग्यान यांनी सांगितलं की, लशीच्या परिणामकारकतेवर तोडगा काढणं, ही सर्वस्वी चीनची जबाबदारी आहे. ही लस परिणामकारक असती तर इतक्या मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढला नसता. मोठ्या प्रमाणात लसीकरण झालेल्या देशात नवीन व्हेरिएंटचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे कोरोना महासाथीचीसुद्धा अनिश्चितता वाढत आहे. वैज्ञानिकांनी नागरिकांची सामाजिक जबाबदारी न पाळणं आणि निष्काळजीपणा करणं याकडे सुद्धा बोट दाखवायला सुरुवात केली आहे. कारण यामुळे सुद्धा संक्रमण मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
First published: