Home /News /coronavirus-latest-news /

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, राज्यात 18 वर्षावरील सगळ्यांना मिळणार मोफत Corona Vaccine

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, राज्यात 18 वर्षावरील सगळ्यांना मिळणार मोफत Corona Vaccine

राज्य सरकारनं एक मेपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणात 18 वर्षावरील सर्वांनादेखील मोफत लस (Free vaccination) देण्याची घोषणा केली आहे. ठाकरे सरकारच्या या निर्णयामुळे लसीकरण अधिक वेगानं होण्यास मदत होणार आहे

    मुंबई 25 एप्रिल : देशात कोरोना महामारीचा (Corona Epidemic) प्रसार वेगानं वाढत असतानाच या विषाणूविरोधात लढा देण्यासाठी लसीकरण मोहिमेला (Vaccination Campaign) वेग देण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशात कोरोनाची सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. अशात राज्यात लसीकरण मोहिम वेगानं राबवण्यासाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारनं एक मेपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणात 18 वर्षावरील सर्वांनादेखील मोफत लस (Free vaccination) देण्याची घोषणा केली आहे. ठाकरे सरकारच्या या निर्णयामुळे लसीकरण अधिक वेगानं होण्यास मदत होणार आहे तसंच अधिकाधिक लोकांचा लस देता येणार आहे. पुण्यात Remdesivir चा तुटवडा असूनही 31 रुग्णालयांची इंजेक्शन नेण्याकडेच पाठ देशभरात वाढत्या रुग्णसंख्येदरम्यान येत्या 1 मेपासून तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात होत आहे. तिसऱ्या टप्प्यात 18 वर्षाहून अधिक वय असणाऱ्या सर्वांना लस दिली जाणार आहे. केंद्रानं याआधीच स्पष्ट सांगितलं आहे की 18 ते 45 या वयोगटातील लोकांनी सरकार व्हॅक्सिन पुरवणार नाही. ही लस त्यांना स्वतःच खरेदी करावी लागेल किंवा मग राज्यांना ही लस विकत घ्यावी लागेल. अशात संकटकाळात राज्य सरकारनं अठरा वर्षावरील सर्वांना मोफत लस देण्याची घोषणा केली आहे. बापरे! 20 कोरोना रुग्णांचं पलायन, यवतमाळमधील कोव्हिड सेंटरमध्ये खळबळ नवाब मलिक यांनी सांगितलं, की सरकारनं असा निर्णय घेतला आहे, की सर्वांना कोरोना लस मोफत दिली जाईल. यासोबत लसीकरण अधिक वेगाने होण्यासाठीही प्रयत्न केले जातील. महाराष्ट्राआधी बिहार, आंध्र प्रदेश आणि उत्तराखंडमध्येही मुख्यमंत्र्यांनी मोफत लसीची घोषणा केली आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Corona vaccination, Corona vaccine, Uddhav thackeray

    पुढील बातम्या