तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह की निगेटिव्ह; CT SCAN मध्ये कसं होतं निदान?

तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह की निगेटिव्ह; CT SCAN मध्ये कसं होतं निदान?

अँटीजेन आणि आरटी-पीसीआर या चाचण्यांमध्येही कोरोनाचं निदान होत नाही; मात्र प्रत्यक्षात कोरोनाचा संसर्ग झालेला असतो. म्हणून मग छातीचा सीटी स्कॅन (Chest CT-Scan) केला जात आहे.

  • Share this:

मुंबई, 27 एप्रिल : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये विषाणूने (Coronavirus) स्वतःमध्ये जनुकीय सुधारणा म्हणजेच म्युटेशन (Mutation)घडवून आणलं आहे. त्यामुळे अनेक रुग्णांमध्ये म्युटंट व्हायरसचा संसर्ग झाल्यानंतर वेगवेगळी लक्षणं दिसत आहेत. ही लक्षणं सर्वसामान्य वाटत असल्यामुळे ती कोरोनाची असतील या शक्यतेचा विचारही रुग्ण करत नाहीत. त्यामुळे तपासणीला उशीर केला जातो. काही वेळा तर अँटीजेन आणि आरटी-पीसीआर या चाचण्यांमध्येही कोरोनाचं निदान होत नाहीमात्र प्रत्यक्षात कोरोनाचा संसर्ग झालेला असतो. म्हणून मग छातीचा सीटी स्कॅन (Chest CT-Scan) केला जात आहे. कोरोना संसर्ग झाला आहे की नाही आणि झाला असल्यास त्याची तीव्रता किती आहेते त्यावरून शोधलं जात आहे.

तज्ज्ञांचं असं म्हणणं आहेकी कोरोनाच्या सध्याच्या लाटेत अनेक कोविड रुग्णांच्या संसर्गाचं निदान आधीच्या पद्धतींच्या आधारे होत नाहीये. त्यामुळे आपण कोरोना निगेटिव्ह असल्याचा विचार करून, हे रुग्ण विलगीकरणात (Isolation) राहत नाहीत आणि संसर्ग पसरत जातो. पॉझिटिव्ह असूनही चाचणीत मात्र निगेटिव्ह असल्याचं आढळणारे रुग्ण हे एक नवं आव्हान बनलं आहे.

विस्तारा एअरलाइन्सची मोठी घोषणा; डॉक्टर, नर्सेसना देशभर मोफत प्रवासाची सुविधा

लालालजपतराय मेमोरियल मेडिकल कॉलेजचे प्रा. डॉ. ए. के. तिवारी यांनी सांगितलंकी अँटीजेन (Antigen) आणि आरटीपीसीआर (RT-PCR)चाचण्यांनंतरही पॉझिटिव्ह रुग्णाचं निदान निगेटिव्हच दाखवलं जाण्यामागे दोन कारणं असू शकतात. एक कारण असं,की म्युटंट व्हायरसने शरीरात प्रवेश केल्यानंतर तो कदाचित नाक किंवा तोंडात जास्त वेळ न राहता थेट फुप्फुसांपर्यंत जाऊन पोहोचत असावा, त्यामुळेच नाका-तोंडातून नमुना घेतल्यावर कोरोना विषाणू तिथे आढळत नाहीमात्र छातीच्या सीटी-स्कॅनमध्ये ते दृष्टीस पडतात.

'कमांडो गर्ल' अदा शर्माचा ग्लॅमरस अंदाज, सोशल मीडियावर PHOTO व्हायरल

कदाचित नाका-तोंडातून नमुना घेतला जात असताना तो चुकीच्या जागेवरून घेतला जात असल्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळेच अँटीजेन आणि आरटीपीसीआर या दोन्ही टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतरही कोरोनाची लक्षणं दिसलीतर डॉक्टर सीटी-स्कॅन करतात. त्यात संसर्ग झाला आहे की नाहीयाचा पत्ता लागतोचपण संसर्ग किती प्रमाणात झाला आहेहेही कळतं. म्हणजेच आजाराचं प्रमाण सौम्य आहेकी फुप्फुसांवर त्याचा विपरीत परिणाम सुरू झाला आहे, हे सीटी स्कॅनचे रिपोर्ट पाहूनही लक्षात येतं.

chest ct scan covid

छातीच्या सीटी-स्कॅनचा सिव्हिरिटी स्कोअर डिजिट्समध्ये असतो. फुप्फुसांचे पाच लोब्ज (Lobes) (भाग) असतात. स्कोअरचा अर्थ आहे फुप्फुसं नॉर्मल स्थितीत काम करत आहेत. हा स्कोअर पाच टक्के लंग इन्व्हॉल्व्हमेंट दर्शवतो. स्कोअर  ते 25 % या टप्प्यात असलातरी सर्वसामान्य मानला जातो. त्यात लोब्जची इन्वॉल्हमेंट ते 25 टक्क्यांपर्यंत असते. स्कोअर 25टक्क्यांपेक्षा जास्त असेल,तर धोक्याचा संकेत आहे. 25 टक्क्यांपासून 75 टक्क्यांपर्यंत स्कोअर असेलतर मध्यम ते गंभीर स्वरूपाचा धोका असू शकतो.

chest ct scan covid

25 टक्क्यांपेक्षा जास्त स्कोअर असेलतर फुप्फुसांच्या सीटी-स्कॅनमध्ये दिसतो आणि डॉक्टर्स त्यानुसार इलाज करतात. कोरोनाच्या रुग्णांनी घरी विलगीकरणात राहूनच रिपोर्टची वाट पाहावी. सुरुवातीला लक्षणं दिसत असूनही रिपोर्ट निगेटिव्ह आलातर ते गांभीर्याने घ्यावं आणि HRCT अर्थात थोरॅक्ससीटी-स्कॅन करावा. त्यातून संसर्गाची तीव्रताही कळेल.

या कारणासाठी सीटी-स्कॅनचा वापर वाढल्यामुळे अनेक ठिकाणी प्रयोगशाळेत वाटेल तेवढी किंमत आकारण्यास सुरुवात झाली होती. आता मात्र केंद्र सरकारने एपिडेमिक डिसीज अॅक्ट  1897नुसार (Epidemic Diseases Act, 1897) त्याची किंमत निश्चित केलीआहे. अनेक राज्य सरकारंही आपापल्या वतीने त्यात काही सवलत देण्याचा प्रयत्नकरत आहेत.

First published: April 27, 2021, 7:58 AM IST

ताज्या बातम्या