• Home
 • »
 • News
 • »
 • coronavirus-latest-news
 • »
 • Jalgaon : महामृत्यूंजय मंत्राच्या जपामुळे कोरोनातून सुटका; योग शिक्षकाचा अजब दावा

Jalgaon : महामृत्यूंजय मंत्राच्या जपामुळे कोरोनातून सुटका; योग शिक्षकाचा अजब दावा

महामृत्यूंजय मंत्राचा सकारात्मक परिणाम दिसल्याचं या योग शिक्षकाचं म्हणणं आहे

 • Share this:
  जळगाव, 14 मार्च : महामृत्युंजय मंत्राचा जप केल्यानं कोरोना बरा होतो, असा अजब दावा जळगावातील एका योग शिक्षकाने केल्याने मोठा गोंधळ उडाला आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने जळगावातील एका रुग्णालयात योग व प्राणायाम शिकवण्यात आलं. कोरोना रुग्णांवर महामृत्युंजय जपाचा सकारात्मक परिणाम झाल्याचा दावा येथील एका योग अभ्यासकाने केला आहे. यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि आयएमएने यावर नाराजी व्यक्त केली आहे. कोणत्याही आजारावर वैद्यकीय उपचार घेणं योग्य आहे, त्यामुळे योग शिक्षकाने केलेल्या दाव्यामुळे तो अडचणीत सापडला आहे. कृणाल महाजन असं या योग शिक्षकाचं नाव आहे. ते जळगावातील निर्धार योग प्रबोधिनीचे सचिव आहेत. गेल्या 9 महिन्यांपासून ते कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांना रुग्णालयात जाऊन योग आणि प्राणायामाचे धडे देतात. महाशिवरात्रीच्या निमित्ताने त्यांनी रुग्णांकडून महामृत्यूंजय मंत्राचा जप करवून घेतला होता. यावेळी 72 वर्षांच्या आजोबाच्या ऑक्सीजनची पातळी 98 टक्क्यांपर्यंत गेल्याचं सांगितलं जात आहे. डॉक्टर प्रयत्न करीत होते, मात्र तरी त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढत नव्हती, मात्र हे महामृत्यूंजय जपामुळे झाल्याचा दावा महाजन यांनी केला आहे. हे ही वाचा-पुण्यात 18 वर्षावरील सर्वांना सरसकट लसीकरण; केंद्र सरकारकडे केली जाणार शिफारस TV9 मराठीने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे. अशा प्रकारे दावा करणं चुकीचं असल्याचं मत अंधश्रद्धा निर्मूलन समितीने व्यक्त केले आहे. कोणताही आजार बरा होण्यासाठी वैद्यकीय उपचार घेणं गरजेचं असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. दरम्यान ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी (Oxford) आणि अॅस्ट्राझेन्का (Astrazeneca) कंपनी यांनी विकसित केलेल्या कोरोनाप्रतिबंधक लशीच्या (Corona Vaccine side effects) साइड-इफेक्ट्सच्या अनुषंगाने सखोल अभ्यास करून आढावा घेतला जाणार असल्याचं केंद्र सरकारने शनिवारी (13 मार्च) जाहीर केलं. ही लस घेतल्यानंतर रक्तात गुठळ्या होत असल्याच्या काही घटनांनतर काही देशांनी या लशीचा वापर थांबवला आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने(centrel government) हा निर्णय जाहीर केला आहे. ही (Covishield Vaccine side effects) लस भारतात पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटने तयार केली आहे.
  Published by:Meenal Gangurde
  First published: