Coronavirus : संपूर्ण देश संकटात, केंद्रानं महाराष्ट्रासह 10 राज्यांना पत्र लिहून दिला गंभीर इशारा

कोरोनानं सर्वाधिक प्रभावित 10 जिल्ह्यांपैकी आठ जिल्हे महाराष्ट्रातील (Corona Cases in Maharashtra) असल्याचंही सरकारनं म्हटलं आहे. आरोग्य सचिव राजेश भूषण (Health Secretary Rajesh Bhushan) यांनी याप्रकरणी सर्व राज्यांना पत्र लिहिलं आहे

कोरोनानं सर्वाधिक प्रभावित 10 जिल्ह्यांपैकी आठ जिल्हे महाराष्ट्रातील (Corona Cases in Maharashtra) असल्याचंही सरकारनं म्हटलं आहे. आरोग्य सचिव राजेश भूषण (Health Secretary Rajesh Bhushan) यांनी याप्रकरणी सर्व राज्यांना पत्र लिहिलं आहे

  • Share this:
    नवी दिल्ली 31 मार्च : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं (Coronavirus Second Wave in India) सरकारच्या चिंतेतही वाढ झाली आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रानं राज्यांनी इशारा दिला आहे. सरकारनं म्हटलं, की कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत परिस्थिती अतिशय गंभीर होत असल्याचं चित्र आहे. केंद्रानं म्हटलं, की संपूर्ण देश संकटात आहे, अशात कोणीही हलगर्जीपणा करायला नको. कोरोनानं सर्वाधिक प्रभावित 10 जिल्ह्यांपैकी आठ जिल्हे महाराष्ट्रातील (Corona Cases in Maharashtra) असल्याचंही सरकारनं म्हटलं आहे. यात दिल्लीचादेखील एका जिल्ह्याच्या रुपातच समावेश आहे. अशा परिस्थितीत केंद्रानं राज्यांना कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवण्याचा आणि लसीकरण (Covid Vaccination Drive) जलदगतीनं करण्याचा सल्ला दिला आहे. मंगळवारी एका पत्रकार परिषदेत बोलताना निती आयोगाचे सदस्य वी के पॉल म्हणाले, की कोरोनाची स्थिती अतिशय गंभीर होत चालली आहे. मागील काही आठवड्यात देशातील काही राज्यांमध्ये हा एक चिंतेचा विषय ठरत आहे. अशात देशातील कोणत्याच भागातील जिल्ह्यात लोकांनी हलगर्जीपणा करायला नको. पॉल म्हणाले,की आपण गंभीर परिस्थितीचा सामना करत आहोत. काही जिल्ह्यांमध्ये प्रमाण जास्त असलं तरी संपूर्ण देश संकटात आहे. त्यामुळे, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आणि लोकांचे जीव वाचवण्यासाठी आपल्याला सगळे प्रयत्न करायला हवे. आरोग्य सचिवांनी दहा राज्यांना लिहिलं पत्र - आरोग्य सचिव राजेश भूषण (Health Secretary Rajesh Bhushan) यांनी याप्रकरणी सर्व राज्यांना पत्र लिहिलं आहे. मंगळवारी एका पत्रकार परिषदेत ते म्हणाले, ज्या दहा जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, त्यात पुणे, मुंबई, नागपूर, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, बंगळुर, नांदेड, दिल्ली आणि अहमदनगरचा समावेश आहे. भूषण म्हणाले, की तसं पाहाता दिल्लीमध्ये अनेक जिल्हे आहेत. मात्र, यात संपूर्ण दिल्लीलाच एक जिल्हा गृहीत धरण्यात आलं आहे. एक एप्रिलपासून तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण - कोरोनाचा वाढता प्रसार पाहाता 1 एप्रिलपासून 45 वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या सर्वांना लस (Corona Vaccination) दिली जाणार आहे. सरकारनं एका आठवड्यापूर्वीच याबद्दलची घोषणा केली आहे. लस घेण्यासाठी तुम्ही CoWIN पोर्टलवर 1 एप्रिलपासून म्हणजेच गुरुवारी दुपारी तीन वाजतानंतर नोंद करू शकता. यासाठी तुम्हाला पोर्टलवर जाऊन रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. यानंतर तुम्ही सरकारी किंवा खासगी रुग्णालयात जाऊन लस घेऊ शकता.
    Published by:Kiran Pharate
    First published: