Home /News /coronavirus-latest-news /

तुम्हाला दिली जाणारी लस खरी की बनावट; अशा पद्धतीनं करा खात्री, सरकारनं दिली माहिती

तुम्हाला दिली जाणारी लस खरी की बनावट; अशा पद्धतीनं करा खात्री, सरकारनं दिली माहिती

खरी लस कशी ओळखावी, यासाठी केंद्राने सर्व आवश्यक माहिती राज्यांना दिली आहे. त्यावरून लस खरी आहे की, बनावट हे पाहून ओळखता येते. फरक ओळखण्यासाठी तिन्ही लसींचे लेबल, रंग, ब्रँडनेम बद्दल माहिती देण्यात आली आहे.

    नवी दिल्ली, 06 सप्टेंबर :  कोरोनाविरोधातील युद्ध लढण्यासाठी जगभरात अधिकाधिक लसीकरण केलं जात आहे. मात्र, यादरम्यान अनेक ठिकाणी बनावट लसी (fake vaccines) दिल्या जात असल्याच्या बातम्याही येत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातही बनावट लसींचा काळा बाजार उघडकीस आला आहे. अलीकडेच, आग्नेय आशिया आणि आफ्रिकेत बनावट कोविडशील्ड लस सापडली, त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने बनावट लसींबद्दल गंभीर इशारा दिला आहे. आता केंद्र सरकारने राज्यांना अशी अनेक मानके सांगितली आहेत, ज्याच्या आधारावर तुम्हाला दिलेली लस खरी आहे की, बनावट आहे हे निश्चित (how to identify fake vaccines) करता येईल. केंद्र सरकारने शनिवारी सर्व राज्यांना या संदर्भात पत्र लिहिलं आहे. एनडीटीव्हीच्या बातमीनुसार, या पत्रात कोवॅक्सिन, कोविशिल्ड आणि स्पुटनिक-व्ही लसीशी संबंधित तपशीलवार माहिती देण्यात आली आहे. जेणेकरून या लसी बनावट आहेत, की नाही याची खात्री करता येईल. सध्या या तीन लसींसह देशात लसीकरण मोहीम राबवली जात आहे. खरी लस कशी ओळखावी, यासाठी केंद्राने सर्व आवश्यक माहिती राज्यांना दिली आहे. त्यावरून लस खरी आहे की, बनावट हे पाहून ओळखता येते. फरक ओळखण्यासाठी तिन्ही लसींचे लेबल, रंग, ब्रँडनेम बद्दल माहिती देण्यात आली आहे. हे वाचा - लग्नाचं आमिष दाखवून महिलेवर वर्षभर बलात्कार, तक्रार केल्यावर दिली जीवे मारण्याची धमकी कोविशिल्ड - SII चे उत्पादन लेबल, लेबलचा रंग गडद हिरवा असेल. - ट्रेड मार्कसह ब्रँड नेम (COVISHIELD). - जेनेरिक नावाचा मजकूर फॉन्ट ठळक अक्षरांमध्ये नसून फिक्कट आहे. - CGS नॉट फॉर सेल त्यावर ओव्हरप्रिंट केलेले असेल. कोवॅक्सीन - लेबलवर अदृश्य पद्धतीचं हेलिक्स, जे केवळ अतिनील प्रकाशाखाली पाहिले जाऊ शकते. -लेव्हल क्लेम मजकूर ठिपक्यांच्या दरम्यान लहान अक्षरांमध्ये लपलेला आहे, ज्यामध्ये COVAXIN म्हटले आहे. कोवॅक्सिनमध्ये दोन रंगांमध्ये 'x' उपलब्ध आहे. ग्रीन फॉइल इफेक्ट त्यामध्ये असतात. स्फुटनिक-व्ही स्फुटनिक-व्ही लस रशियातील दोन वेगवेगळ्या प्लॅंटमधून आयात केली गेली असल्यानं या दोन्हींची लेबल देखील भिन्न आहेत. मात्र, त्यावरील सर्व तपशील आणि डिझाइन समान आहे, फक्त उत्पादकांचे नाव वेगळे आहे. आतापर्यंत आयात करण्यात आलेल्या सर्व लसींपैकी केवळ 5 एम्प्युल पॅकेटवर इंग्रजीमध्ये लेबल लिहिलेले आहे. याशिवाय उर्वरित पॅकेटमध्ये रशियन भाषेत लिहिलेले आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Corona spread, Corona updates, Corona vaccination, Coronavirus

    पुढील बातम्या