मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

PM मोदींचा मोठा निर्णय! कोरोना Vaccines, ऑक्सिजन आणि उपकरणांवरील सीमाशुल्क माफ

PM मोदींचा मोठा निर्णय! कोरोना Vaccines, ऑक्सिजन आणि उपकरणांवरील सीमाशुल्क माफ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्च स्तरीय समितीच्या बैठकीनंतर लगेचच हा निर्णय जाहीर करण्यात आला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देश मोठ्या संकटाचा सामना करत आहे. त्यामुळं या निर्णयानं मोठा दिलासा मिळणार आहे.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 24 एप्रिल : केंद्र सरकारनं (Central Government) कोरोनावरील लसी (Coronavirus Vaccines) आणि ऑक्सिजनवरील (Oxygen) आयातीवर लागणारे सीमा शुल्क आणि आरोग्य सेस तीन महिन्यांसाठी माफ केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्च स्तरीय समितीच्या बैठकीनंतर लगेचच हा निर्णय जाहीर करण्यात आला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देश मोठ्या संकटाचा सामना करत आहे. त्यामुळं या निर्णयानं मोठा दिलासा मिळणार आहे.

कोरोना किंवा इतर आजारासाठी लागणाऱ्या उपकरणांच्या आयातीवरील शुल्कही यामध्ये माफ केलं जाणार आहेत. त्यात ऑक्सिजनबरोबरच त्यासाठीचे जनरेटर, स्टोरेज टँक, फिलिंग सिस्टीम आणि कॉन्सन्ट्रेटर यांच्या आयातीवरही ही सूट लागू असणार आहे. या उपकरणांच्या आयातीवर शुल्क माफ केल्यानं या सर्वांची उपलब्धता वाढेल आणि ते अधिक स्वस्तात मिळू शकतील असं मत केंद्र सरकारनं व्यक्त केलं आहे.

(हे वाचा-पाकिस्तानला मोफत लस पुरवता मग देशाला का नाही? नाना पटोलेंचे केंद्रावर गंभीर आरोप)

भारतात सध्या कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन लसींद्वारे लसीकरण केलं जात आहे. या दोन्ही लसी देशांतर्गत तयार होतात. त्याशिवाय भारतानं रशियाच्या स्पुटनिक व्ही या लशीच्याही आपत्कालीन वापराल मंजुली दिली आहे. त्यामुळं या लसीचे जवळपास 20 कोटी डोस हैदराबादमध्ये तयार केले जाणार आहेत. केंद्र सरकारवर कोरोनाच्या उपयायोजनांकडं दुर्लक्ष केल्याचा आरोप होत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या तीन दिवसांत घेतलेली कोरोनासंबंधीची ही तिसरी तातडीची बैठक आहे.

(हे वाचा-'ऑक्सिजनचा पुरवठा रोखला, तर सोडणार नाही...लटकवूच!' हायकोर्टाने दिली तंबी)

देशात कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि त्यांना मिळणाऱ्या सुविधांचा अभाव यामुळं गेल्या काही दिवसांत देशात मोठं संकट निर्माण झालं आहे. ऑक्सिजन आमि रेमडेसिविरच्या तुटवड्यामुळं तर रुग्णांचे जीव टांगणीला लागलेत. काही रुग्णालयांत ऑक्सिजन अभावी मृत्यूदेखिल झाले आहे. अशा परिस्थितीत सरकारनं सीमा शुल्क माफ केल्यानं ऑक्सिजन, लसी याची उपलब्धता वाढून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

First published:

Tags: Corona, Coronavirus, PM narendra modi