मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

Unlock 4.0 : बहुतांश Lockdown संपला, E pass सुद्धा होणार हद्दपार

Unlock 4.0 : बहुतांश Lockdown संपला, E pass सुद्धा होणार हद्दपार

Unlock 4.0 च्या गाईडलाईन्सनुसार, काय बंद राहणार आणि काय सुरू होणार? 7 सप्टेंबरपासून आणि 21 सप्टेंबरपासून बऱ्याच सवलती मिळणार आहेत. वाचा सविस्तर

Unlock 4.0 च्या गाईडलाईन्सनुसार, काय बंद राहणार आणि काय सुरू होणार? 7 सप्टेंबरपासून आणि 21 सप्टेंबरपासून बऱ्याच सवलती मिळणार आहेत. वाचा सविस्तर

Unlock 4.0 च्या गाईडलाईन्सनुसार, काय बंद राहणार आणि काय सुरू होणार? 7 सप्टेंबरपासून आणि 21 सप्टेंबरपासून बऱ्याच सवलती मिळणार आहेत. वाचा सविस्तर

    नवी दिल्ली, 29 ऑगस्ट : केंद्र सरकारने जारी केलेल्या नव्या नियमांनुसार (Unlock 4.0) प्रवासासाठी लागणारी परवानगी E pass आता हद्दपार होण्याची चिन्हं आहेत. कारण नवीन गाईडलाईन्समध्ये राज्यांतर्गत आणि आंतरराज्य वाहतुकीसाठी पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही, असं स्पष्ट म्हटलं आहे. कंटेन्मेंट झोन वगळता कुठल्याही शहरात, उपनगरात, गावात, जिल्ह्यात आता केंद्राच्या परवानगीशिवाय Lockdown जाहीर करता येणार नाही, असंही या नियमावलीत स्पष्ट म्हटलं आहे. त्यामुळे बहुतांश लॉकडाऊन आता खऱ्या अर्थाने संपला, असं म्हणावं लागेल. राज्य सरकार, जिल्हा प्रशासन किंवा महापालिकादेखील केंद्राच्या परवानगीशिवाय लॉकडाऊन जाहीर करू शकणार नाही. कंटेन्मेंट झोनमध्ये निर्बंध कडक असतील. पण कंटेन्मेंट झोनच्या बाहेर दैनंदिन व्यवहार सुरू होतील. राज्यांतर्गत व्यक्ती किंवा माल वाहतुकीसाठी पूर्वपरवानगी आवश्यक नाही. आंतरराज्य प्रवासावरचे निर्बंधही हटवले. म्हणजेच यापुढे ई पासची आवश्यकता असणार नाही. 7 सप्टेंबर आणि 21 सप्टेंबर महत्त्वाचे Unlock 4.0 मध्ये टप्प्या-टप्प्याने निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. सर्वप्रथम शाळांमध्ये शिक्षकांना यायची मुभा देण्यात आली आहे. एका वेळी निम्मे शिक्षक शाळेत उपस्थित राहू शकतात. ऑनलाईन शिक्षण, स्टडी मटेरिअर, इतर कामांसाठी शिक्षकांना शाळेत यायची परवानगी. नववीच्या वरच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांनाही काही शंका किंवा काम असेल तर पालकांच्या पूर्वपरवानगीने शाळेत येता येईल. Unlock 4.0 : शिक्षकांसाठी आणि नववीच्या पुढच्या विद्यार्थ्यांसाठी उघडणार शाळा 7 सप्टेंबरपासून मेट्रो रेल सुरू होऊ शकते. पण सर्व सेवा एकदम सुरू न करता टप्प्या टप्प्याने सुरू कराव्यात अशा सूचना आहेत. 21 सप्टेंबरपासू सामाजिक, सांस्कृतिक, कौटिंबिक कार्यक्रमांवरचे निर्बंध शिथिल होतील. 100 जणांच्या गेट टुगेदरला परवानगी - सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, धार्मिक किंवा राजकीय संमेलनांना परवानगी नाही. पण 21 सप्टेंबरपासून नियम होणार शिथिल. लॉकडाऊन इतिहासजमा व्हायच्या दिवशीच राज्यातून आली धक्कादायक उच्चांकी आकडेवारी - कुठल्याही प्रकरच्या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त 100 जणांनी एकत्र यायला 21 सप्टेंबरनंतर परवानही. पण प्रत्येकाने मास्क, सॅनिटायझर वापरणं बंधनकारक. प्रत्येकाच्या शरीराचं तापमान मोजूनच संमेलनाला जायची परवानगी - 21 सप्टेंबरपासून ओपन एअर थिएटर उघडायला परवागनी. एसी सिनिमा हॉल बंदच राहणार
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Coronavirus, Lockdown

    पुढील बातम्या