Home /News /coronavirus-latest-news /

CBSE Board Exams 2021: मोठी बातमी! दहावीच्या परीक्षा रद्द तर बारावीच्या परीक्षा ढकलल्या पुढे

CBSE Board Exams 2021: मोठी बातमी! दहावीच्या परीक्षा रद्द तर बारावीच्या परीक्षा ढकलल्या पुढे

देशातील कोरोनाची परिस्थिती पाहता CBSE Board Exams 2021 रद्द करण्याच्या मागणीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल (Education Minister Ramesh Pokhriyal), शिक्षण सचिव आणि इतर अधिकाऱ्यांध्ये ही महत्त्वाची चर्चा पार पडली आहे. या बैठकीत विद्यार्थ्यांविषयी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 14 एप्रिल: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक (Education Minister Ramesh Pokhriyal Nishank), शिक्षम सचिव आणि इतर महत्त्वाच्या अधिकाऱ्यांबरोबर आज चर्चा केली. या बैठकीत सीबीएसईच्या बोर्डाच्या परीक्षा (CBSE Board Exams 2021) घेण्या न घेण्याबाबत अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या असून बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. देशातील कोरोनाची परिस्थिती पाहता CBSE Board Exams 2021 रद्द करण्याच्या मागणीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर अधिकाऱ्यांध्ये ही महत्त्वाची चर्चा पार पडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर शिक्षण मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात ही मोठी घोषणा करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरीयल निशंक, पंतप्रधानांचे प्रधान सचिव, कॅबिनेट सचिव, शाळा व उच्च शिक्षण सचिव आणि अन्य उच्च अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले 1) 4 मे ते 14 जून, 2021 या कालावधीत होणार्‍या बारावीच्या बोर्ड परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या परीक्षा नंतर घेतल्या जातील. बोर्डामार्फत 1 जून 2021 रोजी परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल आणि त्यानंतर यासंबंधीचा अधिक तपशील शेअर केला जाईल, असं या निवेदनात म्हटले आहे परीक्षा सुरू होण्यापूर्वी किमान 15 दिवसांची नोटीस दिली जाईल. (हे वाचा-कोरोनाविरोधातील लढाईत मोठं शस्त्र तयार; आता नाकातच होणार 99.99 व्हायरसचा खात्मा) 2) 4 मे ते 14 जून 2021 या कालावधीत घेण्यात येणा दहावीच्या बोर्ड परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. दहावीचे निकाल बोर्डाकडून विकसित केल्या जाणाऱ्या ऑबजेक्टिव्ह निकषांच्या आधारे निश्चित केले जाणार आहे. या आधारावर एखादा उमेदवार जर  त्याला/तिला देण्यात आलेल्या गुणांमुळे समाधानी नसेल त्याला परीक्षेला बसण्याची संधी दिली जाईल. या परीक्षा तेव्हा घेतल्या जातील जेव्हा परिस्थिती अनुकूल असेल. 
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Board Exam, CBSE, Corona, Corona hotspot, Corona spread, PM narendra modi

    पुढील बातम्या