मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

श्वान आणि मांजरापासून कोरोना पसरतो? माणसाला त्यांच्यापासून किती धोका?

श्वान आणि मांजरापासून कोरोना पसरतो? माणसाला त्यांच्यापासून किती धोका?

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

पहिलं कारण म्हणजे कोरोनाची बाधा झालेल्या माणसांची संख्याच जास्त आहे आणि मांजरींना माणसांकडून संसर्ग होतो आहे.

  • Published by:  Kranti Kanetkar

मुंबई, 07 ऑक्टोबर : कोरोना विषाणूच्या महामारीचे परिणाम आणि त्यावरील औषधांचा जगभर अभ्यास केला जात आहे. कोरोना विषाणूची पाळीव प्राण्यांना लागण होते का आणि त्यांच्यामार्फत हा संसर्ग पसरण्याची कितपत शक्यता आहे, असा प्रश्न सहाजिकच मनात येतो. याचं नव्या संशोधनातून उत्तर मिळालं आहे. श्वान आणि मांजर या दोन्ही प्राण्यांना कोविड-19 विषाणूची लागण होते पण या आजाराविरोधात लढण्यासाठी त्यांच्या शरीरात चांगली क्षमता असते. मांजरी या विषाणूच्या संसर्गाला जबरदस्त विरोध करणारी प्रतिकारशक्ती विकसित करतात. त्यामुळे कोरोनावर लस शोधण्याऱ्या माणसाला मांजरींचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे.

या विषयाचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांनी अमेरिकेतील नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेसमध्ये पाळीव प्राण्यांपासून माणसांना कोरोना होतो याचा कोणताही पुरावा समोर आला नाही असं सांगण्यात आलं आहे. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे या पाळीव प्राण्यांकडून माणसाला कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचं उदाहरण अद्याप समार आलेलं नाही त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही. एका मांजरीमुळे दुसऱ्या मांजरीला मात्र संसर्ग होऊ शकतो, असं संशोधनातून लक्षात आलं आहे.

हे वाचा-कोरोनाशी कसं लढणार? मुंबईत BMCच्या हॉस्पिटल्समध्ये PPE किट्स आणि ग्लोजची टंचाई

नव्या संशोधनातून असं लक्षात आलं आहे की श्वान त्यांच्या श्वासनलिकांच्या वरच्या भागांत कोरोनाचा विषाणू तयार करत नाहीत आणि त्याचा संसर्गही दुसऱ्यापर्यंत (माणूस किंवा श्वान) अजिबात पोहोचवत नाहीत. दुसऱ्या एका अभ्यासात असं लक्षात आलं की श्वान किंवा मांजर दोघंही कोरोनाची लागण झाल्यानंतर आजारी पडले नाहीत. कॉलोरॅडो स्टेट युनिव्हर्सिटीचं व्हेटर्नरी मेडिसीन आणि बायोमेडिकल सायन्सेस कॉलेजमधील संशोधकांसोबत अँजेला एम. बॉस्को-लॉथ, एरिन ई. हार्टविग आणि स्टिफन एम. पोर्टर यांनी हे संशोधन केलं.

मांजरापासून संसर्ग पसरतो पण माणसांना का धोका नाही?

पहिलं कारण म्हणजे कोरोनाची बाधा झालेल्या माणसांची संख्याच जास्त आहे आणि मांजरींना माणसांकडून संसर्ग होतो आहे. दुसरं कारण म्हणजे प्रयोगशाळेत संशोधनासाठी केला जाणारा संसर्ग आणि प्रत्यक्ष आयुष्यात होणारा संसर्ग वेगळा असतो त्यामुळेही तसं होत असावं.

हे वाचा-पाकिस्तानमधील तो व्हायरल चहावाला आठतोय का? आता आहे स्वत:चा कॅफे; पाहा VIDEO

याबाबत बॉस्को लॉथ म्हणाल्या, ‘ मांजरींना नेहमी संसर्ग होत असतोच पण तो माणसाच्या लक्षात येत नाही. जर प्रयोगशाळेत प्रयोगासाठी संसर्गित केलेल्या मांजरींमध्येही लक्षणं दिसत नाहीत.’

या शास्रज्ञांनी अमेरिकेतील फॅरेट. मिंक या पाळीव प्राण्यांवरही प्रयोग केले आहेत. तूर्तात तरी भारतातील श्वान, मांजर या पाळीव प्राण्यांपासून कोरोना विषाणूचा संसर्ग माणसांना होण्याचा धोका नाही असं संशोधनातून दिसत आहे पण काळजी घेणं कधीही चांगलं.

First published:

Tags: Coronavirus, Symptoms of coronavirus