अरे..कोरोनाचा असाही फायदा? 'या' देशावर झाला मोठा परिणाम

अरे..कोरोनाचा असाही फायदा? 'या' देशावर झाला मोठा परिणाम

कोरोनामुळं जगभरात लोकांचं विविध प्रकारचं नुकसान केलं. मात्र एक अनोखा फायदाही कोरोनामुळं झाल्याचं लक्षात आलं आहे.

  • Share this:

लंडन, 31 जानेवारी : कोरोनानं (corona) सगळं जग आणि जगातले व्यवहार विस्कळीत करून टाकले आहेत. मात्र कोरोनामुळं एक फायदा झालाय असं कळल्यावर तुम्ही काय म्हणाल? एका देशातला एक विशिष्ट आजार कोरोनामुळं सौम्य झाल्याचं वास्तव समोर आलं आहे. British Medical Journal नं प्रसिद्ध केलेल्या एका रिपोर्टनुसार, ब्रिटनमध्ये आता फ्लू (flu) जवळपास संपण्याच्या अवस्थेत पोचला आहे. एवढंच नाही, तर फ्लूच्या केसेस ब्रिटनमध्ये (Briton) थेट गेल्या 130 वर्षांमध्ये सर्वात कमी नोंदवल्या गेल्या आहेत. फ्लूच्या केसेसमध्ये (cases) 95 टक्के कमी नोंदवली गेली आहे.

याशिवाय रॉयल कॉलेज ऑफ जनरल प्रॅक्टिशनर्सचे चेअरमन प्रोफेसर मार्टिन मार्शलचं म्हणणं आहे, की कोरोनावर मात करण्यासाठी जे उपाय अवलंबले गेले त्यातूनच कदाचित फ्लूच्या केसेस कमी झाल्या असाव्यात. ब्रिटनमध्ये जानेवारी महिन्यात फ्लूची लक्षणं रिपोर्ट करणाऱ्या लोकांची संख्या खूप जास्त घटली. एक लाख लोकांमागे फ्लूचे लक्षण असलेले लोक सरासरी 1.1 इतके आहेत. मागच्या पाच वर्षात हीच सरासरी 27 इतकी होती.

हे ही वाचा-आणखी एका देशाकडून इच्छामरणाला कायदेशीर मान्यता; मात्र धार्मिकांकडून विरोध कायम

ब्रिटनसह अनेक देशात जानेवारी हा फ्लूचा संसर्ग (infection) पसरण्यासाठी अत्यंत घातक काळ मनाला जातो. मात्र यावर्षी परिस्थिती अगदीच सामान्य म्हणावी अशी दिसते आहे. तज्ञांचं म्हणणं आहे, की यावर्षी फ्लू जवळजवळ संपल्यात जमा असल्याचं चित्र आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (world health organization) WHO संशोधन केंद्राचे संचालक आणि फ्लू तज्ञ जॉन मेकॉले म्हणाले, की आजवरच्या इतिहासात फ्लूच्या केसेसची मोजणी सुरू झाली होती केवळ त्याच वेळी, अर्थात 1988 साली इतक्या कमी केसेस नोंदवल्या गेल्या होत्या. 1989-90 मध्ये फ्लू महामारीमध्ये रुपांतरीत झाला आणि लोक मोठ्या संख्येनं आजारी पडले.

Published by: News18 Desk
First published: January 31, 2021, 8:07 PM IST

ताज्या बातम्या