Unlock 4.0 ची घोषणा करताच देशात कोरोनाचा विस्फोट, 24 तासांत पुन्हा 78 हजार रुग्णांची नोंद

Unlock 4.0 ची घोषणा करताच देशात कोरोनाचा विस्फोट, 24 तासांत पुन्हा 78 हजार रुग्णांची नोंद

आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशात सध्या 36 लाख 21 हजार 246 एकूण कोरोना रुग्ण आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 31 ऑगस्ट : गेल्या काही दिवसांपासून देशात सतत 75 हजारहून अधिक कोरोना रुग्ण सापडत आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशात सध्या 36 लाख 21 हजार 246 एकूण कोरोना रुग्ण आहेत. गेल्या 24 तासांत देशात 78 हजार 512 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. 971 जणांचा मृत्यू झाला. दुसरीकडे देशात Unlock 4.0 घोषणा करण्यात आली आहे. याअंतगर्त मेट्रो सेवसह इतर सेवा सुरू करण्याचे केंद्र सरकारनं जाहीर केले आहे.

सध्या देशात 7 लाख 81 हजार 975 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर, आतापर्यंत 64 हजार 469 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 27 लाख 74 हजार 802 रुग्ण निरोगी झाले आहेत. कोरोना संक्रमित आणि रुग्णांच्या आकड्यांमध्ये भारत जगातील इतर देशांच्या तुलनेत तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारताआधी अमेरिका आणि ब्राझील यांचा क्रमांक लागतो.

वाचा-GOOD NEWS! अवघ्या 42 दिवसांची प्रतीक्षा, ऑक्सफोर्डची कोरोना लस शेवटच्या टप्प्यात

वाचा-GOOD NEWS! अवघ्या 42 दिवसांची प्रतीक्षा, ऑक्सफोर्डची कोरोना लस शेवटच्या टप्प्यात

इंडियन काउन्सिल ऑप मेडिकल रिसर्चने (ICMR) दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत 4 कोटी 23 लाख 07 हजार 914 टेस्टिंग झाल्या आहेत. यातील 8 लाख 46 हजार 278 सॅम्पल रविवारी टेस्टिंग करण्यात आले.

42 दिवसात मिळणार कोरोना लस

ब्रिटेनची ऑक्सफोर्ड युनिवर्सिटीच्या कोरोना लशीवर संपूर्ण जगातं लक्ष आहे. या लशीचं ट्रायल शेवटच्या टप्प्यात असून express.co.uk मध्ये आलेल्या रिपोर्टनुसार अवघ्य 42 दिवसांत म्हणजेच 6 आठवड्यात कोरोनाची लस तयार होऊ शकते. express.co.uk मध्ये आलेल्या रिपोर्टनुसार ब्रिटेनच्या सरकारच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ऑक्सफोर्ड युनिवर्सिटी आणि इंपेरियल कॉलेज लंडनचे वैज्ञानिक लस तयार करण्याच्या अत्यंत जवळ पोहोचले आहेत.

Published by: Priyanka Gawde
First published: August 31, 2020, 10:10 AM IST

ताज्या बातम्या