Home /News /coronavirus-latest-news /

CoronaVirus : ओमायक्रॉनची दुसऱ्यांदा बाधा होऊ शकते? एक्सपर्ट्सनी दिलं हे उत्तर

CoronaVirus : ओमायक्रॉनची दुसऱ्यांदा बाधा होऊ शकते? एक्सपर्ट्सनी दिलं हे उत्तर

कोरोना व्हायरसचा (coronavirus) नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (omicron spread) हा जगासह देशभरात झपाट्याने फैलावत असल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

  नवी दिल्ली, 15 जानेवारी – कोरोना व्हायरस (coronavirus latest news) नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (omicron) हा जगासह देशभरात झपाट्याने फैलावत असल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. ओमायक्रॉनच्या दहशतीच्या पार्श्वभूमीवर आता एक्सपर्ट्सनी (expert advice on Omicron infection ) आणखी एक  धोक्याचा इशारा (Covid-19 Alert) दिला आहे. ओमायक्रॉनची (Can omicron infects you twice) एकदाच नव्हे, तर दोनदा लागण होऊ शकते, असा दावा अमेरिकेचे एपिडेमिओलॉजिस्ट इरिक फिगल-डिंग (Eirc Feigl-Ding) यांनी केला आहे. ओमायक्रॉनची पुन्हा लागण होणं शक्य आहे, असं त्यांनी सांगितलं. इरिक यांनी ट्विटरवर सांगितले, की जर तुम्हाला ओमायक्रॉनचा संसर्ग कमी प्रमाणात झाला असेल आणि तुमची रोकप्रतिकारक शक्ती (Immunity system) उत्तेजित झालेली नसेल किंवा तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमी असेल तर काळजी घेणं आवश्यक आहे. सेंटर फॉर डिसिस कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (CDC) या अमेरिकेच्या हेल्थ एजन्सीच्या माहितीनुसार, कोविड-19 ची पुन्हा लागण होणं अपेक्षित आहे. कोरोना विषाणूची पुन्हा पुन्हा लागण होण्याबद्दल वैज्ञानिक अभ्यास करत आहेत. इतर तज्ज्ञांच्या मते, आतापर्यंतच्या डेटावरून हेच लक्षात आलं आहे की एकदा लागण झाल्यानंतर दुसऱ्यांदा लागण होण्यापासून संरक्षण होऊ शकेलच असं नाही.

  Corona Virus: कोविड-19 च्या उपचारासाठी WHO कडून 'या' औषधांची शिफारस, होईल फायदा

  जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO)च्या माहितीनुसार, ओमायक्रॉन हा भिन्न प्रकारचा व्हरिएंट असून, त्याचे म्युटेशन मोठ्या प्रमाणात होत आहे. त्याच्या स्पाइक प्रोटिनमध्ये 26 -32 म्युटेशन होत आहे. याच कारणामुळे ओमायक्रॉन हा व्हायरस अधिक संसर्गजन्य आहे. लोकं ओमायक्रॉन व्हायरसशी इतके मिळतेजुळते झाले आहेत की, इतर संसर्गजन्य आजारांप्रमाणे बाधेची तीव्रता जास्त असेल, तर त्याच्यापुढे रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा काहीच काम करू शकत नाही, असा इशारा एम. डी. संसर्गजन्य रोगतज्ज्ञ आणि व्हँडरबिल्ट युनिव्हर्सिटी ऑफ मेडिसिनचे प्राध्यापक विलियम शॅफनर यांनी दिला आहे. ओमायक्रॉनवरील डेटा मर्यादित असताना इम्पेरिअल कॉलेज ऑफ लंडनने नुकताच एका संशोधनात खुलासा केला की, ओमायक्रॉनचा संसर्ग डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेत 5.4 पटीने अधिक आहे. कोविड-19 ची पुन्हा लागण होण्यापासून मिळणाऱ्या संरक्षणापेक्षा ओमायक्रॉनच्या संसर्गापासून होणारे संरक्षण 19 टक्क्यांनी कमी आहे.

  Omicron च्या नव्या स्ट्रेनचा कहर; ब्रिटनमध्ये आढळले रुग्ण, लोकांमध्ये पसरतो वेगानं

  तथापि, एक्सपर्ट्सनी पुनरुच्चार केला की, संसर्गाचा लोकांवर कसा प्रभाव पडतो यासाठी दोन्ही संसर्गामधील वेळ आणि मध्यांतर हा एक मोठा घटक आहे. रटगर्स विद्यापीठातील सेंटर फॉर एडव्हान्स बायोटेक्नॉलॉजी आणि मेडिसिन विभागाचे संचालक एम.डी. मार्टिन जे. ब्लेझर (Martin J.Blaser) सांगतात, “शेवटच्या संसर्गापासूनचे अंतर जितके जास्त असेल तितके तुमचे त्या संसर्गापासून संरक्षण कमी होईल”.
  Published by:News18 Web Desk
  First published:

  Tags: Coronavirus, Omicron

  पुढील बातम्या