लॉकडाऊनमध्ये 7 लाख देऊन थायलँडहून बोलावली कॉल गर्ल; 2 दिवसांनी भारतातच केले अंत्यसंस्कार
लॉकडाऊनमध्ये 7 लाख देऊन थायलँडहून बोलावली कॉल गर्ल; 2 दिवसांनी भारतातच केले अंत्यसंस्कार
राजस्थानातल्या बाडमेरमध्ये गोल्डन स्पा नावाने स्पा सेंटर चालवलं जात होतं. त्याचा पर्दाफाश पोलिसांनी केला. तिथे 5 तरुणींना आणि 2 युवकांना रंगेहाथ पकडण्यात आलं आहे.
एका टॉप व्यापाऱ्याच्या मुलाने 7 लाख रुपये खर्च करुन थायलँडमधून बोलावलं होतं.
उत्तर प्रदेश, 8 मे : कोरोना महासाथीदरम्यान राजधानी लखनऊमधून एक हैराण करणारं वृत्त समोर आलं आहे. येथे थायलँडमधून आलेल्या एका कॉल गर्लचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात एका मागोमाग एक धक्कादायक खुलासे झाले. मिळालेल्या माहितीनुसार कॉल गर्लला 10 दिवसांपूर्वी लखनऊच्या एका टॉप व्यापाऱ्याच्या मुलाने 7 लाख रुपये खर्च करुन थायलँडमधून बोलावलं होतं. 2 दिवसानंतर ती आजारी पडली. त्यानंतर तिला लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आलं. येथे 3 मे रोजी तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी आधी थायलँड एम्बरीशी संपर्क केला आणि तरुणीच्या कुटुंबीयांना डेडबॉडी हँडओव्हर करण्याचा प्रयत्न केला. मात्र हे होत नसल्याने शनिवारी एजन्ट सलमान याच्या उपस्थिती तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला. या एजन्टच्या माध्यमातून ती भारतात आली होती.
कॉल गर्लच्या मृत्यूनंतर आता पोलीस राजधानीत पसरणाऱ्या या इंटरनॅशनल सेक्स रॅकेटबाबत माहिती गोळी करीत आहे. पोलिसांचं म्हणणं आहे की, या कॉल गर्लच्या संपर्कात कोण कोण आलं होतं, त्याचाही शोध सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही कॉल गर्ल राजस्थानमध्ये राहणाऱ्या एका ट्रॅव्हल एजंटच्या संपर्कात आली होती. त्यानेच तिला लखनऊला पाठवलं होतं. पोलिसांनी आता या एजन्टचा तपास सुरू केला आहे.
हे ही वाचा- लॉकडाऊनचा नियम मोडून मशिदीत केली गर्दी, पाहा पोलिसांच्या छापेमारीचा Live Video
पोलिसांनी केलेल्या तपासात आलेल्या माहितीनुसार एका व्यापाऱ्याच्या मुलाने कॉल गर्लची तब्येत बिघडल्यामुळे स्वत: थायलँड एम्बसीला फोन करुन याबाबत माहिती दिली होती. यानंतर एम्बसीने भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या मदतीने तिला रुग्णालयात दाखल केलं.
Published by:Meenal Gangurde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.