मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /दारूसाठी कोव्हिड सेंटरमधून पॉझिटिव्ह रुग्ण पळाला, उचलून रुग्णालयात आणलं परत

दारूसाठी कोव्हिड सेंटरमधून पॉझिटिव्ह रुग्ण पळाला, उचलून रुग्णालयात आणलं परत

कोव्हिड सेंटरमधून रुग्ण पळून जाण्याच्या घटना गेल्या काही दिवसांपासून वाढल्या आहेत. बुलडाण्यामधून (Covid Center in Buldana) देखील अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

कोव्हिड सेंटरमधून रुग्ण पळून जाण्याच्या घटना गेल्या काही दिवसांपासून वाढल्या आहेत. बुलडाण्यामधून (Covid Center in Buldana) देखील अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

कोव्हिड सेंटरमधून रुग्ण पळून जाण्याच्या घटना गेल्या काही दिवसांपासून वाढल्या आहेत. बुलडाण्यामधून (Covid Center in Buldana) देखील अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

राहुल खंदारे, बुलडाणा, 19 मार्च: कोव्हिड सेंटरमधून रुग्ण पळून जाण्याच्या घटना गेल्या काही दिवसांपासून वाढल्या आहेत. बुलडाण्यामधून (Covid Center in Buldana) देखील अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र कोरोनाच्या (Coronavirus) उपचारांना कंटाळून किंवा हॉस्पिटलमध्ये राहण्याला वैतागून नव्हे तर याठिकाणी रुग्ण पळाला आहे ते चक्क दारूसाठी. दारू पिता यावी याकरता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाने पलायन केल्याच्या घटनेने रुग्णालयात खळबळ उडाली होती. जेवण आणि दारूसाठी हा 55 वर्षीय रुग्ण कोरोना सेंटरमधून पळाला होता. त्यानंतर त्याला रिक्षामधून रुग्णालयामध्ये परत आणण्यात आले. या घटनेचा एक व्हिडीओ समोर आले आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील खामगावजवळ असलेल्या घाटपुरी येथील कोव्हिड सेंटर मधून चक्क 55 वर्षीय कोरोना रुग्ण जेवणासाठी आणि मध्यप्राशनसाठी बाहेर पडला होता. त्याने एका हॉटेलमध्ये जाऊन दारू प्यायली आणि जेवणही केलं. त्यावेळी जास्त दारू प्यायल्याने तो रस्त्यालगतच पडून होता. त्यावेळी गावातील काही तरुणांनी त्याला उपचारासाठी खामगाव शासकीय रुग्णालयात दाखल केले. विशेष म्हणजे घाटपुरी येथील कोविड सेंटर वर जेवण निकृष्ट दर्जाचे मिळत असल्याची ओरड होत असताना हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

(हे वाचा-या राज्यातून महाराष्ट्रात जाण्या-येण्यावर निर्बंध; कोरोना प्रकोपामुळे बससेवा बंद)

घाटपुरी येथील कोव्हिड सेंटर मधून एक कोरोना पोझिटिव्ह रुग्ण चक्क बाहेर जाऊन अनेकांच्या संपर्कात येतो त्यावेळी कोव्हिड सेंटर मधील सुरक्षा यंत्रणा काय करत होती? तहसीलदार याकडे दुर्लक्ष करत आहेत का? शिवाय या रुग्णाला परत आणण्याची व्यवस्था रुग्णालयाकडून का करण्यात आली नाही? असे अनेक सवाल या प्रकारानंतर उपस्थित होत आहेत. त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून तहसीलदार यांच्यावरच कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे

First published:

Tags: Alcohol, Buldhana news, Corona, Corona hotspot, Corona updates, Corona vaccination