Bubonic plague: कोरोनापेक्षा भयंकर अशा ब्यूबॉनिक प्लेगनं घेतला दुसरा बळी, चीनमध्ये हाय अलर्ट

Bubonic plague: कोरोनापेक्षा भयंकर अशा ब्यूबॉनिक प्लेगनं घेतला दुसरा बळी, चीनमध्ये हाय अलर्ट

या आजारामुळं 5 कोटी लोकांचा मृत्यू झाला. आता पुन्हा एकदा हा रोग चीनमध्ये पसरत आहे.

  • Share this:

मंगोलिया, 09 ऑगस्ट : कोरोनाव्हायरस या अदृश्य रोगाशी सारं जग दोन हात करत असताना आता आणखी एक रोगाची चाहुल लागली आहे. या आजाराचे नाव आहे ब्यूबॉनिक प्लेग (Bubonic plague). इनर मंगोलियन स्वायत्त प्रदेश, बयन्नुर येथे ब्यूबॉनिक प्लेगचे रुग्ण सापडल्यानंतर हाय अलर्ट जारी करण्यात आला होता. मात्र आता ब्यूबॉनिक प्लेगमुळे आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी इनर मंगोलियन स्वायत्त प्रदेशात एकाचा मृत्यू झाला. यानंतर या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या सात लोकांची तपासणी केली जात आहे.

या आजारामुळं 5 कोटी लोकांचा मृत्यू झाला. आता पुन्हा एकदा हा रोग चीनमध्ये पसरत आहे. याला काळा मृत्यू (Black death) असेही म्हणतात. याआधी काही दिवसांपूर्वी चीनमध्ये ब्यूबॉनिक प्लेगचा पहिला बळी गेला होता. या रुग्णांचा मृत्यू अवयव निकामी झाल्यामुळे झाला असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. यामुळे आता या भागांमध्ये लेव्हल 3 हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

वाचा-साऱ्या जगाला आशा देणारी ऑक्सफर्डची कोरोना लस शास्त्रज्ञांमुळेच अडचणीत

असा पसरतो ब्यूबॉनिक प्लेग

हा रोग मुख्यत: जंगली उंदरांमध्ये आढळणार्‍या बॅक्टेरियांमुळे होतो. या बॅक्टेरियाचे नाव येरसिनिया पेस्टिस बॅक्टेरियम (Yersinia Pestis Bacterium) आहे. हा जीवाणू शरीरातील लिम्फ नोड्स, रक्त आणि फुफ्फुसांवर हल्ला करतो. यामुळे बोटं काळी पडतात व सडतात. ब्यूबॉनिक प्लेग प्रथम जंगली उंदरांना होतो. उंदरांच्या मृत्यूनंतर या प्लेगचे जीवाणू मानवी शरीरात प्रवेश करतात. उंदरांच्या मृत्यूनंतर दोन ते तीन आठवड्यांनंतर मानवामध्ये प्लेग पसरतो.

वाचा-शाळा सुरू होताच कोरोनाचा विस्फोट! 11 विद्यार्थी पॉझिटिव्ह, 268 क्वारंटाइन

याआधीच कोट्यवधी लोकांचा मृत्यू

जगभरात ब्यूबॉनिक प्लेगची सुमारे 3248 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. त्यापैकी 584 लोकांचा मृत्यू झाला आहे. या वर्षांमध्ये, बहुतेक प्रकरणे डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, मेडागास्कर, पेरूमध्ये आढळून आली. इनर मंगोलियन स्वायत्त प्रदेश, बयन्नुर यांनी प्लेगच्या प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी तिसर्‍या टप्प्याचा इशारा दिला आहे. शनिवारी बयन्नुर येथील रूग्णालयात ब्यूबॉनिक प्लेगच्या संशयास्पद दोन घटना उघडकीस आल्या. स्थानिक आरोग्य विभागाने घोषणा केली की हा अलर्ट 2020 अखेरपर्यंत असेल.

Published by: Priyanka Gawde
First published: August 9, 2020, 12:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading