मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

विद्यार्थ्यानं तयार केला माईक अन् स्पीकर असणारा खास मास्क, चार्जिंग करुन करता येणार वापर

विद्यार्थ्यानं तयार केला माईक अन् स्पीकर असणारा खास मास्क, चार्जिंग करुन करता येणार वापर

केरळमध्ये बीटेकचं (BTech) शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याने स्पेशल मास्क तयार केला आहे. या मास्कमध्ये माइक आणि स्पीकर बसवल्यानं (Mic & Speaker) मास्क वापरणाऱ्याने बोललेलं समोरच्या माणसाला सहजपणे ऐकू जातं.

केरळमध्ये बीटेकचं (BTech) शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याने स्पेशल मास्क तयार केला आहे. या मास्कमध्ये माइक आणि स्पीकर बसवल्यानं (Mic & Speaker) मास्क वापरणाऱ्याने बोललेलं समोरच्या माणसाला सहजपणे ऐकू जातं.

केरळमध्ये बीटेकचं (BTech) शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याने स्पेशल मास्क तयार केला आहे. या मास्कमध्ये माइक आणि स्पीकर बसवल्यानं (Mic & Speaker) मास्क वापरणाऱ्याने बोललेलं समोरच्या माणसाला सहजपणे ऐकू जातं.

तिरुअनंतपुरम 21 मे - 'गरज ही शोधाची जननी' अशी म्हण आपण मराठीत वापरतो. ती आपल्याला नेहमी प्रत्ययाला येत नाही, पण सातत्याने नवं काही करण्याची इच्छा असलेल्या माणसाला मात्र ती सतत प्रत्ययाला येते. कोरोना महामारीच्या काळात मात्र ही म्हण अनेकदा सत्यात उतरली आहे. माणसाला जेव्हा एखाद्या गोष्टीची गरज निर्माण होते तेव्हा तो त्याचं उत्तर, त्याच्यावरचा उपाय शोधूनच काढतो. कोरोना काळापूर्वी भारतात पीपीई किट (PPE Kit) आणि सॅनिटायझर (Sanitizer) मोठ्या प्रमाणात तयार होत नव्हतं. ते आता देशात तयार होऊ लागलं. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला तेव्हा आपण मेडिकल ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात निर्माण करू लागलो. हे सांगण्याचं कारण असं की केरळमध्ये बीटेकचं (BTech) शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याने स्पेशल मास्क तयार कूला आहे. मास्क लावल्यावर येणाऱ्या अडचणींवर हा मास्क उपाय ठरणार आहे. टीव्ही 9 हिंदीने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

साधा मास्क वापरताना समोरच्या व्यक्तीशी बोलताना त्रास होतो. ऐकणाऱ्याला नीट ऐकू येत नाही. या अडचणी लक्षात घेऊन केरळमधल्या थ्रिसूरच्या सरकारी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये (Government Engineering College) बीटेक फर्स्ट इअरला शिकणारा विद्यार्थी केविन जेकब याने एक मास्क तयार केला आहे ज्यात त्याने माइक आणि स्पीकर बसवला आहे.

केविन म्हणाला, ‘ माझे आई-वडील डॉक्टर आहेत. ते गेल्या वर्षापासून कोविडवर उपचार करत आहेत. तोंडावर मास्क आणि त्यावर फेस शील्डचे तीन लेअर वापरून त्यांना रुग्णांशी संवाद साधणं प्रचंड कठीण जातं हे मी बघितलं. तेव्हा मला ही कल्पना सुचली. मी मास्कमध्ये माइक आणि स्पीकर बसवला (Mic & Speaker). ज्यामुळे मास्क वापरणाऱ्याने बोललेलं समोरच्या माणसाला सहजपणे ऐकू जातं. त्यामुळे डॉक्टरांना संवाद साधताना खूप कष्ट करावे लागत नाहीत. माझा पहिला प्रोटोटाइप माझे वडील डॉ. सेनोज केसी आणि आई डॉ. ज्योती मेरी जोस हिने वापरला. त्यांना तो वापरणं सहज वाटल्यावर तो इतरांनाही उपलब्ध करून दिला.’

बॅटरीवर चालतो मास्क

केविनने या मास्कमधील माइक आणि स्पीकरचा वापर व्हावा म्हणून त्याला बॅटरी बसवली आहे. ही बॅटरी (Battary) अर्ध्या तासात चार्ज होते आणि चार ते सहा तास हा मास्क नीट वापरता येतो. लोहचुंबकाचा वापर करून ही बॅटरी मास्कला जोडली आहे. केरळमधल्या ज्या डॉक्टरांनी हा मास्क वापरला त्यांनी तो वापरायला सहज आणि प्रचंड उपयोगी असल्याचं सांगितलं. तसंच त्यांना आता रुग्णांशी संवाद साधताना मोठ्यानं बोलावं लागत नाही त्यामुळे सहज संवाद होतो असंही त्यांनी सांगितलं.

आतापर्यंत केविनने 50 मास्क तयार केले असून त्याला मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्याची इच्छा आहे, त्यासाठी तो कंपनीच्या शोधात आहे. तो म्हणाला, ‘ मला मोठ्या प्रमाणात मास्क तयार करायचे आहेत पण सध्या माझ्याकडे पैसे नाहीत. त्यामुळे एखादी व्यक्ती किंवा कंपनीने मला मोठ्या प्रमाणावर उत्पादनासाठी मदत केली तर अनेक लोक या नव्या मास्कचा वापर करू शकतील.’

First published:

Tags: Face Mask, Mask, Positive story