मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

कोरोनाची दुसरी लाट जवळपास ओसरली; ब्रिटन भारताला 'रेड लिस्ट'मधून काढणार?

कोरोनाची दुसरी लाट जवळपास ओसरली; ब्रिटन भारताला 'रेड लिस्ट'मधून काढणार?

परराष्ट्र सचिवांनी त्यांच्या भेटीदरम्यान यूके सरकारच्या वरिष्ठ प्रतिनिधींशी बैठका घेतल्या. श्रृंगला म्हणाले, मुंबई, दिल्लीसारखी मोठी शहरे कोविडमुक्त झाली आहेत.

  • Published by:  Kiran Pharate

लंडन 25 जुलै : परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी शनिवारी सांगितलं, की ब्रिटनच्या (Britain) परराष्ट्र कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना भारतातील कोरोना (Coronavirus in India) स्थितीबद्दल माहिती देण्यात आली आहे. देशातील बहुतेक मोठी शहरं आता कोरोनामुक्त झाली आहेत. ते म्हणाले की, ब्रिटिश अधिकाऱ्यांनाही भारतातून आलेल्या पर्यटकांच्या प्रवासावरील बंदीचा आढावा घेण्याचा विचार करण्यास सांगण्यात आलं आहे. परराष्ट्र सचिव पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांच्यात झालेल्या ब्रिटन-भारत संबंधांच्या कराराचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी दोन दिवसाच्या दौऱ्यावर गेले आहेत.

Candida auris चे रुग्ण आढळल्यानं खळबळ; उपचारही उपलब्ध नसल्यानं चिंता वाढली

आंतरराष्ट्रीय प्रवासाला प्रोत्साहित करण्यासाठी भारत सरकारच्या 'समान लस प्रमाणपत्र' प्रणाली सुरू करण्याच्या योजनाही त्यांनी सामायिक केल्या. परराष्ट्र सचिवांनी त्यांच्या भेटीदरम्यान यूके सरकारच्या वरिष्ठ प्रतिनिधींशी बैठका घेतल्या. श्रृंगला म्हणाले, “मुंबई, दिल्ली, मोठी शहरे कोविडमुक्त झाली आहेत. मात्र, या परिस्थितीमध्येही आम्ही निवांत राहू शकत नाही, कारण सतर्क राहाणं अत्यंत गरजेचं आहे.

'मास्क वापरणं वेडेपणा; Corona आंतरराष्ट्रीय कट!' म्हणणाऱ्या डॉक्टरविरुद्ध गुन्हा

आंतरराष्ट्रीय प्रवासाबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, “कोविडच्या भारतातील परिस्थितीविषयी मी त्यांना (ब्रिटीश अधिकाऱ्यांना) माहिती दिली. मी त्यांना हेही सांगितलं, की फ्रान्सने भारतातून येणाऱ्या प्रवाशांना विलगीकरणात ठेवण्याची आवश्यकता नसल्याचं सांगितलं आहे. मात्र, त्यांनी लसीचे दोन डोस घेतले असावे आणि कोरोना चाचणी निगेटिव्ह असावी, इतकीच अट आहे. सोबतच अमेरिकाचंही उदाहरण देत त्यांनी ब्रिटनला याबाबत विचार करण्यास म्हटलं आहे. तिथे असणाऱ्या सध्याच्या नियमांनुसार भारत रेड लिस्टमध्ये आहे. त्यामुळे, प्रवासात अडथळे येत आहेत.

First published:

Tags: Britain, Corona virus in india