'औषधानं नाही तर व्हिस्की पिऊन कोरोनामुक्त झालो', अजब दावा करणाऱ्या तरुणाचा मृत्यू

'औषधानं नाही तर व्हिस्की पिऊन कोरोनामुक्त झालो', अजब दावा करणाऱ्या तरुणाचा मृत्यू

कॉनोर चर्चेत आला जेव्हा, त्याने अँटीबायोटिक्स न घेता व्हिस्की-मध प्यायल्यानं कोरोना बरा होता असा दावा केला होता.

  • Share this:

लंडन, 02 नोव्हेंबर : ब्रिटनमध्ये राहणाऱ्या एका 26 वर्षीय मुलाचा कोरोनामुळे मृत्यू झआला. 11 महिन्यांआधी या तरुणाला कोरोनाची लागण झाली होती. कॉनोर रीड असे या तरुणाचे नाव असून तो चीनच्या वुहानमधील महाविद्यालयात शिकवत होता. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये चीनच्या वुहानमधूनच कोरोनाचा प्रसार होण्यासा सुरुवात झाली. यात कॉनोरही कोरोना पॉझिटिव्ह निघाला.

दरम्यान, कॉनोर चर्चेत आला जेव्हा, त्याने अँटीबायोटिक्स न घेता व्हिस्की-मध प्यायल्यानं कोरोना बरा होता असा दावा केला होता. त्यानं कोरोनामुक्त झाल्याचाही दावा केला होता. त्याच वेळी, द सनच्या वृत्तानुसार, कॉनोर बरा झालाच नव्हता. त्यामुळे त्याचा 11 महिन्यांनी मृत्यू झाला.

वाचा-कोरोना लशीच्या अंतिम टप्प्यातील चाचणीचं मोठं आव्हान, 10 लशींमध्ये अशी आहे चुरस

असा सांगितले जात आहे की, कॉनोर हा ब्रिटनमधला पहिला व्यक्ती आहे ज्याला कोरोनाची लागण झाली होती. गेल्या आठवड्यात कॉनोर यूकेमधील एका विद्यापीठाच्या खोलीत मृत आढळला. ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या त्याच्या आईने असे म्हटले आहे की कोरोना इन्फेक्शन झाल्यावर तो कधीही बरा झाला नाही. कॉनोरच्या आईने सांगितले की लॉकडाऊन दरम्यान, कॉनोरला वुहानमध्ये 16 आठवडे, ऑस्ट्रेलियामध्ये 2 आठवडे आणि ब्रिटनमध्ये तीन आठवडे रहावे लागले. तिच्या आईने सांगितले की निर्बंधांमुळे ती स्वत: मुलाच्या अंत्यसंस्कारास भाग घेऊ शकली नाही. दुसरीकडे यूकेमध्ये आतापर्यंत 9 विद्यार्थ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

वाचा-टोमण्यांना कंटाळून कोरोना वॉरियरनं उचललं टोकाचं पाऊल, सुसाईड नोटमध्ये लिहिलं...

यापूर्वी, कॉनोरने एका मुलाखतीत सांगितले की, मला कोरोनापासून वाचण्यासाठी उपाय सापडला आहे. कॉनोरच्या आईने सांगितले की, त्याला चिनी भाषा शिकण्याची आवड होती, म्हणून तो तिकडे गेला होता.

इंग्लंडमध्ये पुन्हा लॉकडाऊन जाहीर

फ्रान्सनंतर आता इंग्लंडमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी कोरोनाचा धोका पाहता देशात दुसऱ्यांदा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. 5 नोव्हेंबरपासून लॉकडाऊनचा कालावधी सुरू होणार आहे. 2 नोव्हेंबरला हा लॉकडाऊन संपणार आहे.

वाचा-WHOचे जनरल डायरेक्टर कोरोना पॉझिटिव्हच्या संपर्कात, स्वत: झाले क्वारंटाइन

युरोपमध्ये कोरोनाची दुसरी लाट, मोठ्या प्रमाणात वाढतायत रुग्ण

युरोपीय देशांमध्ये कोरोनानं पुन्हा कमबॅक केलं असून मोठ्या प्रमाणात लोकांना संसर्ग होत आहे. याआधी फ्रान्समध्ये 4 आठड्यांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. फ्रान्समध्ये रात्री कर्फ्यू तर दिवसा अत्यावश्यक सेवा आणि शाळा वगळता सर्व बंद ठेवण्यात येणार आहे. तर इंग्लंडमध्ये आरोग्य सेवा, मेडिकल सर्व्हिस, व्यायामासाठी बाहेर पडणं आणि अभ्यास, शाळा इत्यादी सेवा सुरू राहणार आहेत. शक्य असेल त्यांना वर्क फ्रॉम होम करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तर मोठे व्यवसाय, दुकानं, रेस्टॉरंट आणि पब बंद ठेवण्यात येणार आहेत.

Published by: Priyanka Gawde
First published: November 2, 2020, 1:09 PM IST

ताज्या बातम्या