नवी दिल्ली, 19 एप्रिल : देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (Former PM Manmohan Singh) यांनी देशात निर्माण झालेल्या महामारीच्या स्थितीबद्दल चिंता व्यक्त करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पत्रही लिहिलं होतं. त्यातच त्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले आहे.
ANI ने यासंगर्भातील ट्वीट केलं आहे. त्यांना दिल्लीतील AIIMS रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
Former PM Manmohan Singh tests positive for COVID19, admitted to AIIMS Trauma Centre in Delhi: AIIMS Official (file photo) pic.twitter.com/zZtbd6POWd
— ANI (@ANI) April 19, 2021
हे ही वाचा-मनमोहन सिंग यांचं पंतप्रधान मोदींना पत्र, Corona विरुद्ध लढण्यासाठी दिले 5 मंत्र
आणखी डोसची ऑर्डर देणे आवश्यक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात डॉ. मनमोहन सिंग यांनी म्हटलं, लस निर्माता कंपन्यांपैकी कोणत्या कंपनीला सरकारने पुढील सहा महिन्यांसाठी आणि किती डोसची ऑर्डर दिली आहे हे सरकारने जाहीर करावे. जर आपण या 6 महिन्यांच्या काळात निश्चित करण्यात आलेल्या नागरिकांचे लसीकरण केले तर आपल्याला आणखी डोसची ऑर्डर देणे आवश्यक आहे. जेणेकरुन लसींचे डोस आपल्याकडे उपलब्ध असतील.
लोकसंख्येपैकी किती टक्के लोकांचं लसीकरण
मनमोहन सिंग यांनी सुचवले की, कोरोनाच्या या लसींच्या डोसचे वितरण हे पारदर्शक पद्धतीने झाले पाहिजे. आपण किती नागरिकांचे लसीकरण केले आहे हे पाहण्याऐवजी आपल्या लोकसंख्येपैकी किती टक्के लोकांचं लसीकरण केलं याकडे लक्ष दिले पाहिजे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Covid-19 positive, Delhi, Manmohan singh