Home /News /coronavirus-latest-news /

आता सापाचं विषच काढणार कोरोनाचा काटा; व्हायरसचा होणार खात्मा

आता सापाचं विषच काढणार कोरोनाचा काटा; व्हायरसचा होणार खात्मा

कोरोनावर सापाचं विष भारी (फोटो सौजन्य - रॉयटर्स)

कोरोनावर सापाचं विष भारी (फोटो सौजन्य - रॉयटर्स)

एका विशिष्ट प्रकारच्या सापाच्या विषातला एक घटक कोरोना विषाणूविरोधात प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे.

ब्राझिलिया, 01 सप्टेंबर : कोरोना विषाणूचा (Coronavirus) संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी जगभरातले शास्त्रज्ञ रात्रंदिवस मेहनत करत आहेत. कोरोना विषाणूला नेस्तनाबूत करण्यासाठी कोणता घटक काम करू शकेल, याबद्दल वेगवेगळ्या मार्गांनी विचार सुरू आहे आणि त्यावर प्रयोगही केले जात आहेत. आता सापाच्या विषाचाही (Snake Venom)  कोरोनाव्हायरसवर (Snake venom against coronavirus) प्रयोग करण्यात आला आहे. सापाच्या विषाने कोरोनाव्हायरसचा काटा काढण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. ब्राझीलमधल्या (Brazil) एका विशिष्ट प्रकारच्या सापाच्या विषातला एक घटक पेशींमधल्या कोरोना विषाणूच्या (Reproduction of Coronavirus) पुनरुत्पादनावर विपरीत परिणाम करत असल्याचं अलीकडेच झालेल्या एका प्रयोगात ब्राझीलमधल्या शास्त्रज्ञांना आढळलं आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. मॉलिक्युल्स (Molecules) नावाच्या सायंटिफिक जर्नलमध्ये या संशोधनाबद्दलचा लेख प्रसिद्ध झाला आहे. कोरोना संसर्ग झालेल्या माकडांच्या पेशींवर हे संशोधन करण्यात आलं होतं. ब्राझीलसह दक्षिण अमेरिकेमध्ये आढळणाऱ्या Jararacussu pit viper या सापाच्या विषातल्या घटकामुळे कोरोना विषाणूच्या पुनरुत्पादनाची क्षमता 75 टक्क्यांनी घटली, असं या संशोधनात आढळलं. हे वाचा - आणखी एका महासाथीचं संकट! कोरोनाव्हायरसनंतर West Naile Virus चं थैमान युनिव्हर्सिटी ऑफ साओ पाउलोमधले प्राध्यापक राफाएल गिडो यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन झालं. 'या सापाच्या विषातला एक घटक कोरोना विषाणूमधल्या एक महत्त्वाच्या प्रथिनाचं कार्य निष्प्रभ करण्यात यशस्वी ठरल्याचं आमच्या संशोधनात आढळलं,' असं त्यांनी म्हटलं आहे. कोरोना विषाणूमधलं PLPro नावाचं विकर (Enzyme) त्याच्या पुनरुत्पादनासाठी महत्त्वाचं असतं. ब्राझिलियन पिट व्हायपरच्या विषातलं एक पेप्टाइड म्हणजेच अमिनो आम्लांची साखळी अन्य पेशींना धक्का न लावता विषाणूमधल्या त्या विकराला जोडली जाते. या पेप्टाइडमध्ये जिवाणू-प्रतिबंधक गुणधर्म आहेत, हे आधीच ज्ञात आहे. शिवाय, या पेप्टाइडची निर्मिती प्रयोगशाळेतही करणं शक्य आहे. त्यामुळे यासाठी ब्राझिलियन पिट व्हायपर हा साप पकडणं किंवा पाळणं अजिबात गरजेचं नाही, असं गिडो यांनी एका मुलाखतीत सांगितलं. या पेप्टाइडचा नेमका किती प्रमाणातला डोस कार्यक्षम ठरतो हे तपासलं जाणार आहे. तसंच, हे पेप्टाइड आधीच शरीरात असेल तर कोरोना विषाणू पेशीत प्रवेशच करत नाही का, हेही तपासलं जाणार आहे. याची मानवी चाचणीही केली जाणार आहे; मात्र ती कधी केली जाणार, याबद्दल मात्र काहीही सांगण्यात आलेलं नाही. हे वाचा - 4 महिन्यांची प्रेग्नंट वाटत होती; कुत्र्याने पोटावर उडी मारताच बाहेर पडला मृत्यू दरम्यान, साओ पाउलोमधल्या बटानन इन्स्टिट्यूटमधलं बायोलॉजिकल कलेक्शन सांभाळणारे सर्पतज्ज्ञ गिसेपे प्युअर्टो यांनी नागरिकांना Jararacussu pit viper सापाची शिकार न करण्याचं आवाहन केलं आहे. 'आपण जग वाचवायला चाललो आहोत असा विचार करून या सापांची शिकार करू नये. थेट त्याचं विष कोरोनावर उपयुक्त ठरत नाही, हे लक्षात घ्यावं,' असं त्यांनी सांगितलं आहे. Jararacussu pit viper हा ब्राझीलमधल्या सर्वांत मोठ्या सापांपैकी एक आहे. त्याची लांबी सहा फुटांपर्यंत असू शकते. किनारी अॅटलांटिक जंगलात त्याचं वास्तव्य असतं. तसंच बोलिव्हिया, पॅराग्वे आणि अर्जेंटिनामध्येही तो आढळतो.
First published:

Tags: Coronavirus, Snake

पुढील बातम्या