लंडन, 22 जुलै : एकदा कोरोना झाला, त्यावर उपचार झाले म्हणजे आता आपण बरे झालो असं बिलकुल नाही. यानंतरही बऱ्याच समस्या उद्भवतात ज्याला लाँग कोविड म्हटलं जातं. कितीही आणि कोणतेही उपचार केले तरी लाँग कोव्हिडपासून अनेकांना सुटका मिळत नाही आहे. अखेर आता काही यापासून मुक्ती मिळवण्याचा एक वेगळा मार्ग निवडला आहे. ज्यात ते आपल्या शरीरातील संपूर्ण रक्त काढत आहेत म्हणजे ब्लड वॉशिंग करत आहेत.
ब्रिटिश मेडिकल जर्नलमधील एका रिपोर्टनुसार लाँग कोव्हिडचा उपचार म्हणून लोक आता ब्लड वॉशिंगची मदत घेत आहेत. या रिपोर्टनुसार उपचाराचा कोणताच मार्ग नसल्याने लोक आता ब्लड वॉशिंगसारख्या अप्रमाणित आणि महागड्या उपचारांकडे वळत आहेत. परदेशात जाऊन हा उपचार घेत आहेत.
कोरोनावरील उपचारात प्रायोगिक तत्वावर केल्या जाणाऱ्या या उपचार पद्धतीला वैद्यकीय भाषेत Apheresis म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर यामध्ये शरीरातील सर्व रक्त काढलं जातं. ते फिल्टर केलं जातं. त्यातील काही विशिष्ट घटक काढले जातात किंवा बदलले जातात आणि तेच रक्त दुसऱ्या नसेतून पुन्हा शरीरात सोडलं जातं. लाँग कोव्हिडसाठी ब्लड वॉशिंग करताना यात सूज आणि रक्ताच्या गुठळ्या होण्यास कारणीभूत ठरणारे घटक फिल्टर केले जातात.
हे वाचा - मोबाईलच्या अतिवापराने आयुष्य होतंय कमी? संशोधकांचा इशारा, लवकर व्हा सावध
ही उपचार पद्धत काही आजारांसाठी फायद्याची ठरू शकते. जसं की सिकल सेल ज्यात लाल रक्तपेशी सहजरित्या हटवता येतील. तसंच ल्युकेमिया अज्यात पांढऱ्या रक्तपेशी तात्पुरत्या स्वरूपात हटवता येकील किंवा दात्यामार्फत मिळालेल्या पांढऱ्या रक्तपेशी रक्तात घेता येतील. पण लाँग कोव्हिडवर ही उपचार पद्धत किती प्रभावी ठरते, याचा काही धोका नाही, हे अद्याप सिद्ध झालेलं नाही. तरी सोशल मीडियावरील चर्चांमुळे याकडे अनेकांचं लक्ष वेधलं जातं आहे. तज्ज्ञांच्या मते, ब्लड वॉशिंग उपचार पद्धती अवलंबण्यापूर्वी त्याबाबत अधिक संशोधन आणि ट्रायलची गरज आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Coronavirus, Health, Lifestyle