मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

Coronavirus: ऑक्सिजनची मागणी करणाऱ्या भाजप खासदाराच्या भावाचं कोरोनानं निधन

Coronavirus: ऑक्सिजनची मागणी करणाऱ्या भाजप खासदाराच्या भावाचं कोरोनानं निधन

मोहनलालगंज मतदारसंघातील भाजप खासदार कौशल किशोर यांच्या मोठ्या भावाचंही कोरोनानं निधन (BJP MP Kaushal Kishore's Elder Brother Dies) झालं आहे.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 25 एप्रिल : देशात कोरोनामुळे (Coronavirus in India) परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये कोरोनाचा प्रसार वाढला आहे. नुकतंच लखनऊचे आमदार सुरेश श्रीवास्तव यांचं कोरोनानं निधन झालं आहे. अशात आता लखनऊच्या मोहनलालगंज मतदारसंघातील भाजप खासदार कौशल किशोर यांच्या मोठ्या भावाचंही कोरोनानं निधन (BJP MP Kaushal Kishore's Elder Brother Dies) झालं आहे.

खासदार कौशल किशोर यांचे मोठे भाऊ महावीर प्रसाद यांनी एका कोविड रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला. आपल्या भावाच्या निधनानं दुःखी असलेल्या कौशल किशोर यांनी म्हटलं, की कोरोनानी त्यांच्याकडून त्यांचा भाऊ हिरावला आहे. कौशल किशोर यांचा मुलगा विकासनं सांगितलं, की महावीर प्रसाद सरकारी सेवेतून सेवानिवृत्त झाले होते. आजतकनं दिलेल्या वृत्तानुसार, विकासनं सांगितलं की महावीर व्हेंटिलेटरवर होते. त्यांचं वय जवळपास 85 वर्ष होतं.

देशात जाणवणार ऑक्सिजन, बेडचा तुटवडा; केंद्राला मागील वर्षीच सावध केल्याचा दावा

खासदार कौशल किशोर यांनी शनिवारीच उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्याकडे कोरोना रुग्णांना ऑक्सिजन उपलब्ध करुन देण्याची मागणी केली होती. कौशल किशोर म्हणाले होते, माननीय मुख्यमंत्री जी यांच्याकडे मागणी आहे, की अनेक कोरोना रुग्ण गृहविलगीकरणामध्ये आहेत. त्यांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे. अशा लोकांना ऑक्सिजन मिळवण्यात मोठे कष्ट घ्यावे लागत आहेत.

लखनऊमध्ये दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होताना दिसत आहे. लखनऊच्या पश्चिम क्षेत्रातील भाजप आमदार सुरेश श्रीवास्तव यांचंही एका दिवसापूर्वीच निधन झालं आहे. तेदेखील मागील सात दिवसांपासून व्हेंटिलेटरवर होते. कोरोना पॉझिटिव्ह आल्यापासून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांचं वय 76 वर्ष होतं. त्यांच्या निधनानंतर राजनाथ सिंह, भाजपचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांच्यासह अनेक नेत्यांनी दुःख व्यक्त केलं होतं.

First published:

Tags: BJP, Corona patient, Coronavirus, Oxygen supply