लॉकडाऊनमध्ये नियम मोडणाऱ्यांची खैर नाही; या राज्यात झाली पहिली शिक्षा!

लॉकडाऊनमध्ये नियम मोडणाऱ्यांची खैर नाही; या राज्यात झाली पहिली शिक्षा!

लॉकडाऊनमध्ये नियम मोडल्याप्रकरणी तब्लिगी जमातीच्या 17 सदस्यांना कोर्टाने शिक्षा सुनावली आहे.

  • Share this:

पाटणा, 3 डिसेंबर :  कोरोना व्हायरसचा (Covid 19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन (Lockdown) लागू करण्यात आला होता. या लॉकडाऊनच्या काळात काही जण नियमांचे सर्रास उल्लंघन करुन इतरत्र फिरताना दिसले. लॉकडाऊनच्या काळात नियम मोडणाऱ्या व्यक्तींसाठी एक महत्वाची बातमी आहे. या मंडळींना आता शिक्षा देण्यास सुरुवात झाली आहे. या प्रकरणात बिहारमध्ये (Bihar) तब्लिगी जमातीच्या (Tablighi Jamaat) 17 सदस्यांना पाटणा कोर्टाने (Patna Court) शिक्षा सुनावली आहे. या प्रकारच्या गुन्ह्यात बिहारमध्ये झालेली ही पहिलीच शिक्षा आहे.

काय सुनावली शिक्षा?

पाटणा सिव्हिल कोर्टाचे विशेष न्यायाधीश माधवी सिंह यांनी या प्रकरणातील सर्व आरोपींना कोर्टाच्या कामकाजाची वेळ संपेपर्यंत (सकाळी साडेदहा ते साडेचार) पर्यंत कारावास आणि प्रत्येकी 25 हजार रुपये आर्थिक दंडाची शिक्षा सुनावली आहे. यापूर्वी या सर्व आरोपींना जामीन मिळाला होता. बुधावारी त्यांच्यावरील आरोपांची कोर्टात सुनावणी झाली. त्यावेळी सर्वांनी गुन्हा कबुल केला. त्यानंतर कोर्टाने ही शिक्षा सुनावली.

हे ही वाचा-शेतकऱ्यांसाठी सुरू झाली पुरस्कार परत करण्याची मोहीम, आंदोलकांनी जेवण नाकारलं

काय होतं प्रकरण?

पाटणामध्ये लॉकडाऊन सुरु असताना 13 एप्रिल 2020 रोजी या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही सर्व मंडळी शहरातील दोन वेगवेगळ्या भागातील रहिवासी आहेत. लॉकडाऊनच्या काळात नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तब्लिगी जमातीचे सदस्य देशभरात चर्चेत आले होते. बिहारमध्ये देखील या प्रकरणात तब्लिगीच्या सदस्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.

दरम्यान ब्रिटनमध्ये (britain) कोरोना लशीच्या (covid 19 vaccine) वापराला मंजुरी दिल्यानंतर संपूर्ण जगाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आता भारतात कोरोना लस (corona vaccine) कधी मिळणार, याची प्रतीक्षा सर्वांना आहे. दरम्यान यूकेपाठोपाठ (UK) आता भारतातही लवकरच कोरोना लशीला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. दिल्लीतील एम्सनं AIIMS ही मोठी माहिती दिली आहे.

Published by: News18 Desk
First published: December 3, 2020, 4:27 PM IST

ताज्या बातम्या