Home /News /coronavirus-latest-news /

Big News : देशात कोरोनाची तिसरी लाट; 'या' राज्यात 10 दिवसात मोठी रुग्णवाढ

Big News : देशात कोरोनाची तिसरी लाट; 'या' राज्यात 10 दिवसात मोठी रुग्णवाढ

Third wave of corona : याच राज्यातून कोरोनाचा पहिला रुग्ण समोर आला होता.

    नवी दिल्‍ली, 8 जुलै : केरळमधील (Kerala) सक्रिय कोरोना रुग्णसंख्येत गेल्या 10 दिवसात तब्बल 12,000 संख्येने वाढ झाली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, केरळमध्ये सक्रिय रुग्णसंख्या 28 जून रोजी 96,012 होती, जी 7 जुलै रोजी 1.08 लाखांपर्यंत पोहोचली. याशिवाय 5 जुलैपासून सक्रिय रुग्णसंख्येत तब्बल 7,300 ची वाढ झाली आहे. याशिवाय देशातील अन्य भागात कोरोना व्हायरस महासाथीची (Corona Virus Pandemic) दुसरी लाट कमी होताना दिसत आहे. काही तज्ज्ञांनी केरळमधील रुग्णसंख्या वाढ म्हणजे कोरोना महासाथीची तिसरी लाट (Third wave of corona ) असल्याचं सांगितलं आहे. CNN-News18 द्वारा विश्लेषण केलेल्या आकड्यांनुसार, केरळमधील दररोजची रुग्णसंख्या 28 जूनपासून दुप्पट झाली आहे. तर राज्यात 28 जून रोजी 8,063 नवीन रुग्ण दाखल झाले आहेत. बुधवारी दररोजची रुग्णसंख्या वाढून 15,600 पर्यंत पोहोचली आहे. राज्यात गेल्या 10 दिवसात तब्बल 1.23 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. केरळमधील एकूण कोविड रुग्णसंख्या 2 महिन्यापेक्षा कमी कालावधीत दुप्पट झाली आहे. कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये 28 जूनपासून राज्यात किमान 1119 मृत्यू झाल्याचे सरकारी आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. केरळमधील एकूण कोरोनाव्हायरस संख्या दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत दुप्पट झाली आहे. 16 मे रोजी राज्यात मृतांची संख्या 6,339 होती, ती 16 जूनला 11,508 पर्यंत पोहोचली. सध्या मृतांचा आकडा 14,108 इतका आहे. हे ही वाचा-डेल्टा प्लस व्हॅरिएंटचा धोका; तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला केरळने जानेवारी 2020 मध्ये भारतातील पहिले कोरोना व्हायरस रुग्णांची सूचना दिली होती. देशात महासाथीची घोषणा करण्यापूर्वी कोरोना व्हायरसची पहिल्या आणि दुसरी लाटेदरम्यान केरळमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान भारतात गेल्या 10 दिवसात दैनिक आणि सक्रिय कोरोना रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. 28 जून ते 7 जुलैदरम्यान देशात सक्रिय केस लोडमध्ये 1.13 लाखांहून अधिक घट पाहायला मिळत आहे. तर दररोजच्या संख्येत 46,148 हून घट झाली असून ती 43,733 पर्यंत पोहोचली आहे. गेल्या 10 दिवसात देशात तब्बल 7500 जणांचा मृत्यू झाला आहे. भारतात एकून कोरोनामुळे मृतांची संख्या 4.05 लाख झाली आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Coronavirus, Coronavirus cases, Kerala

    पुढील बातम्या