• Home
 • »
 • News
 • »
 • coronavirus-latest-news
 • »
 • रुग्ण दाखल असतानाही रत्नागिरीतील 13 कोविड केअर सेंटरला लावलं टाळ

रुग्ण दाखल असतानाही रत्नागिरीतील 13 कोविड केअर सेंटरला लावलं टाळ

गणेशोत्सवात कोरोनाची रुग्णसंख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात असताना कोरोना सेंटरचं बंद करण्यात आलं आहे.

 • Share this:
  रत्नागिरी, 1 सप्टेंबर : राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती असताना रत्नागिरीतील 13 कोविड केअर सेंटर बंद करण्यात आल्याचं समोर आलं आहे. शेकडो कंत्राटी डॉक्टर्स, नर्स, डेटा ऑपरेटर आणि इतर पदावरील कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात आलं आहे. (13 Covid Care Centers in Ratnagiri closed despite patient admission) केवळ शासकीय रुग्णालयातील कोविड केयर सेंटर सुरू राहणार असल्याचं सांगितलं जात आहे. जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या आदेशानुसार कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय झाल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांची दिली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोविड सेंटर बंद केल्याने, अचानक रुग्ण वाढले तर काय करायचे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कोविड सेंटर मध्ये रुग्ण अॅडमिट असताना अचानक सेंटर बंद करण्यात आलं आहे. यामधील गंभीर रुग्णांना शासकीय सेंटरमध्ये हलविण्यात आलं असून इतर रुग्णांला होम आयसोलेशनमध्ये पाठविण्यात आलं आहे. हे ही वाचा-कोरोना लसीकरणाबाबत UP पहिल्या क्रमांकावर; महाराष्ट्राच्या नावी आहे हा रेकॉर्ड दरम्यान कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या (Coronavirus third wave) पार्श्‍वभूमीवर कधीही बेड ताब्यात घेणार, त्यामुळे तयारीत रहा अशा आशयाचे पत्र पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) आरोग्य विभागाने शहरातील सर्व खासगी रुग्णालयांना पाठवले आहे. महापालिकेने करोनाच्या यापूर्वीच्या दोन लाटांमध्ये सुमारे 80 टक्के बेड खासगी रुग्णालयांकडून ताब्यात घेतले होते. या पार्श्वभूमीवरआताही पालिकेने 50 टक्के बेड्स कोरोनासाठी राखीव ठेवण्याची तयारी ठेवलीय. यापैकी 10 टक्के बेड्स हे लहान मुलांसाठी ठेवावेत, अशाही सूचना दिल्या आहेत.
  Published by:Meenal Gangurde
  First published: