मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

लशीकरणाचा मार्ग खडतर ! कोरोना लस लोकांपर्यंत पोहोचवण्यात 'हे' अडथळे येणार

लशीकरणाचा मार्ग खडतर ! कोरोना लस लोकांपर्यंत पोहोचवण्यात 'हे' अडथळे येणार

जगभर धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनावर औषध शोधण्यासाठी जगातले अनेक देश प्रयत्न करत आहेत. मात्र अनेक प्रगत देशांमध्ये कोरोना लशीच्या विरोधात आंदोलन उभं राहिलं असून WHOला त्याची दखल घ्यावी लागली आहे.

जगभर धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनावर औषध शोधण्यासाठी जगातले अनेक देश प्रयत्न करत आहेत. मात्र अनेक प्रगत देशांमध्ये कोरोना लशीच्या विरोधात आंदोलन उभं राहिलं असून WHOला त्याची दखल घ्यावी लागली आहे.

कोरोना लस (corona vaccine) जरी मिळाली तरी जगातल्या सर्व लोकांपर्यंत ती लस पोहचवणं म्हणजे मोठं आव्हानच आहे.

  • Published by:  Amruta Abhyankar
मुंबई, 26 ऑक्टोबर: जगभरात कोरोना (Corona)चं संक्रमण वेगाने वाढत आहे. मागील काही महिन्यांपासून कोरोनाने लाखो लोकांचे प्राण घेतले आहे. त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने यावर लसीशिवाय पर्याय नसल्याचं म्हटलं आहे. परंतु जाणकारांच्या मतानुसार, लस आल्यानंतरदेखील कोरोनाचं संकट कमी होणार नाही. कारण भारताबरोबरच जगभरातील विकसनशील आणि गरीब राष्ट्रांतील सरकारांना त्यांच्या सर्व नागरिकांपर्यंत लस पोहोचवणं खूप अवघड गोष्ट ठरणार आहे. कोरोनाची लस सुरक्षित ठेवण्यासाठी नॉन-स्टॉप रेफ्रिजरेशनची गरज लागणार आहे. लशीसोबत सुयांचीदेखील व्यवस्था सरकारला करावी लागणार आहे. जगभरातील 7.8 दक्षलक्ष लोकसंख्येपैकी जवळपास 3 दशलक्ष नागरिक राहत असलेल्या भागात कोल्ड स्टोरेजची व्यवस्था उपलब्ध नाही. त्यामुळे या लस सांभाळून ठेवणं सरकारसाठी आव्हानच असणार आहे. कोरोनाची लस ठेवण्यासाठी उणे 70 डिग्री सेल्सियस असणारे अल्ट्राकोल्ड स्टोरेजची गरज भासणार आहे. त्यामुळे विकसीत देशांसाठी देखील ही गोष्ट सोपी असणार नाही. थंडीच्या दिवसात अनेक देशांमध्ये कोरोनाची लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्या देशांमध्ये कोरोनाची लस जपून ठेवणं या देशांसाठी मोठं आव्हान असणार आहे. कोल्ड स्टोअरेजची व्यवस्था नाही   लॉजिस्टिक एक्स्पर्टनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभावी लसीकरण करायचं असल्यास रेफ्रिजरेशनची व्यवस्था असणं गरजेचं आहे. त्यामुळे भारत, दक्षिण आशिया, लॅटिन अमेरिका आणि आफ्रिकेमधील अनेक देशांकडे या सुविधेचा अभाव असून या देशांमध्ये लस ठेवण्यासाठी पर्यायी सुविधा उपलब्ध नाही. अमेरिका आणि युरोपमधील हॉस्पिटलमध्येदेखील या लस ठेवण्यासाठी सुविधा उपलब्ध नाही. ही लस ठेवण्यासाठी उणे 70 डिग्री सेल्सियस असणारे अल्ट्राकोल्ड स्टोरेजची आवश्यकता भासणार आहे. जाणकारांच्या मतानुसार आफ्रिकेच्या पश्चिमेकडील देशांमध्ये ही व्यवस्था चांगली आहे. 2014 मध्ये इबोलाच्या संक्रमणावेळी त्यांनी लस ठेवण्यासाठी ही सुविधा तयार केली होती. त्यामुळे कोरोनाच्या लस ठेवण्यासाठी त्यांच्याकडे पर्यायी सुविधा उपलब्ध आहे.
First published:

Tags: Corona, Corona vaccine

पुढील बातम्या