नवी दिल्ली, 9 जानेवारी : गेल्या अनेक महिन्यांपासून भारतीय कोरोना लशीची प्रतीक्षा करीत आहे. मार्च 2020 पासून देशभरातच नव्हे तर जगभरात दहशत पसरवलेल्या कोरोनापासून केव्हा सुटका मिळणार यासाठी नागरिक प्रतीक्षेत आहे. अखेर ही प्रतीक्षा संपली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याबाबत मोठी घोषणा केली. लवकरच देशातील प्रत्येक नागरिकाला टप्प्या टप्प्याने कोरोनाची लस उपलब्ध होणार आहे. (Prime Minister Modi announced the date of vaccination)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Narendra Modi) शनिवारी कोविड (Covid-19) लसीकरणासाठी राज्य/केंद्र शासित प्रदेशांना तयारीसाठी एक उच्च-स्तरीय बैठकीच्या अध्यक्षस्थानी राहून संबोधित केलं. ज्यामध्ये कॅबिनेट सचिव, प्रधान सचिव आणि आरोग्य सचिव यांच्याव्यतिरिक्त इतर अधिकारी सहभागी झाले होते. या बैठकीनुसार, 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण सुरू होणार आहे. लसीकरणाच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीच्या टप्प्यात पहिल्यांदा आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स यांना प्राथमिकता दिली जाईल. ज्याची सर्वसाधारण संख्या तब्बल 3 कोटी आहे. यानंतर 50 हून अधिक वय असलेल्या आणि गंभीर आजाराशी मुकाबला करणाऱ्यांना लस दिली जाईल. ज्यात साधारण 27 कोटी लोकांचा सहभाग आहे. सूचना कार्यालयाकडून (PIB) उपलब्ध केलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने मकरसंक्रांत, पोंगल आदी सणांनंतर लसीकरणाचं अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
हे ही वाचा-धक्कादायक! कोरोना लस घेतलेल्या आणखी एकाचा मृत्यू; ठणठणीत डॉक्टरचा गेला जीव
सर्व राज्यात यापूर्वीच कोरोन लशीचे ड्राय रन सुरू आहेत. भारतात दोन कोरोना लशींच्या आपात्कालीन वापराला मंजुरी देण्यात आली आहे. भारत बायोटेकची कोवॅक्सिन आणि पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटनं ऑक्सफोर्ड-अॅस्ट्राझेनेकाच्या मदतीनं तयार केलेली कोव्हिशिल्ड या दोन लशी आहेत. लशींची सध्याची उपलब्धता बघता केंद्र सरकारने ज्या गटांना अधिक धोका आहे, अशा गटांची प्राधान्याने लशीकरणासाठी निवड केली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात 30 कोटी नागरिकांना लस पुरवण्याचं सरकारचं लक्ष्य आहे. यामध्ये आरोग्य कर्मचारी (Health workers) आणि फ्रंटलाईन वर्कर्सचा (Frontline Workers) समावेश आहे. त्यानंतरच्या दुसऱ्या टप्प्यात 50 वर्षांवरील व्यक्ती तसेच 50 पेक्षा कमी वयाच्या परंतु अन्य गंभीर आजार (comorbid) असणाऱ्या व्यक्तींना प्राधान्याने लस दिली जाणार आहे. 3 कोटी लोकांना मोफत लस दिली जाणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.